SpaceX च्या लिस्टिंगमुळे तीन भारतीय इंजिनीअर्स करोडपती होण्याच्या मार्गावर; नेमकं काय घडलं?
SpaceX's IPO Indian engineers एलन मस्क यांच्या 'SpaceX' ने शेअर बाजारात दमदार एन्ट्रीनंतर तीन भारतीय वंशाच्या इंजिनियर्सही होणार कोट्यधीश
SpaceX’s IPO Three Indian engineers on the path to becoming multi-millionaires : एलन मस्क यांची अंतराळ संशोधन कंपनी ‘SpaceX’ ने नुकतीच ‘Nasdaq’ शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. या ऐतिहासिक लिस्टिंगमुळे केवळ एलन मस्क यांची संपत्ती 1 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली नसून, त्याचा मोठा फायदा मस्क यांच्याच ‘xAI’ कंपनीत कार्यरत असलेल्या तीन भारतीय वंशाच्या प्रतिभावान इंजिनियर्सनाही मिळणार असून, ते करोडपती होण्याच्या मार्गावर आहेत. हे तीन इंजिनीअर्स नेमके कोण? त्यांना कसा फायदा होणार? याबद्दल जाणून घेऊया…
कर्मचाऱ्यांचे नशीब कसे बदलणार?
एलन मस्क यांच्या कंपन्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त कंपनीचे शेअर्स (Equity/Stock) देण्याबाबत ओळखल्या जातात. यावर्षी SpaceX ने xAI चे अधिग्रहण केले, ज्यामुळे xAI च्या कर्मचाऱ्यांचे शेअर्स आता SpaceX च्या शेअर्समध्ये रूपांतरित झाले आहेत. या तिन्ही इंजिनीअर्सकडे वरिष्ठ पदे असल्याने त्यांच्याकडे कंपनीचे मोठे स्टेक असण्याची दाट शक्यता आहे. SpaceX चे बाजार मूल्य 2.2 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचल्याने या शेअर्सचे मूल्य आता प्रचंड वाढले आहे. यामुळे हे तिन्ही भारतीय इंजिनियर्स भविष्यात करोडपती किंवा अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक बनू शकतात.
IPO ची प्रतीक्षा नाही, तर थेट फायदा
विशेष म्हणजे, SpaceX कडून कर्मचाऱ्यांना खाजगी व्यवहारांद्वारे आपले शेअर्स विकण्याची संधी वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे, केवळ IPO वर अवलंबून न राहता, कंपनीच्या वाढत्या व्हॅल्यूएशनचा फायदा या कर्मचाऱ्यांना लगेच मिळत आहे.
कोण आहेत हे भारतीय इंजिनीअर्स?
xAI कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र चापलोट, अमन मदान आणि आदित्य गुप्ता हे मस्क यांच्या IPO मुळे आता चर्चेत आले आहेत. एप्रिल 2026 मध्ये या तिघांना कंपनीत मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. ज्यात देवेंद्र चापलोट यांनी IIT बॉम्बे मधून शिक्षण पूर्ण केले असून, ते AI मॉडेलच्या सुरुवातीच्या ट्रेनिंग टीमचे नेतृत्व करत आहेत. अमन मदान हे AI मॉडेल निर्मितीसाठी आवश्यक असणारे टूल्स आणि पायाभूत सुविधांची जबाबदारी सांभाळत आहेत. तर, गुगल बार्ड आणि गुगल असिस्टंटचा अनुभव असलेले आदित्य गुप्ता हे सध्या AI मॉडेल्सना प्रत्यक्ष उत्पादनांत रूपांतरित करण्याचे काम करत आहेत.
भारतीय प्रतिभेचा जागतिक ठसा
जगातील अत्याधुनिक AI आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अभियंते सातत्याने आपली छाप पाडत आहेत. SpaceX आणि xAI मधील या तीन भारतीय इंजिनीअर्सच्या यशामुळे भारतीय तांत्रिक कौशल्याचा जागतिक स्तरावरील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.