Download App

PM Modi यांची मिमिक्री करणाऱ्या आर्टिस्टच्या अडचणी आणखी वाढल्या…

Shyam Rangeela Pm Modi Mimicry : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिलला कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (PM Modi at Bandipur Tiger Reserve safari) गेले होते. पंतप्रधानही राखीव भागात सफारीवर गेले होते. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले होते. त्यानंतर ते जंगल सफारीला गेले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ दिसला नाही. त्यावेळी पीएम मोदींना हत्ती पाहायला मिळाले. यासोबतच काही रानगवे, ठिपकेदार हरीण आणि सांबरही पाहायला मिळाले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच जंगल सफारीची हुबेहूब नक्कल एका श्याम रंगीला नावाच्या मिमिक्री आर्टिस्टने केली होती. हा तरूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची मिमिक्री करत हा तरूण प्रसिद्ध झाला आहे. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगल सफारीची हुबेहूब नक्कल केली. मोदींप्रमाणे गेटअप करत तो जयपुरच्या झालाना जंगलामध्ये पोहचला. नील गाईला खाद्य पदार्थ खावू घातल्याचा व्हिडीओ त्याने बनवला.

PM मोदींना जंगल सफारीत वाघ दिसलाच नाही; वाहन चालकावर ठपका, नोकरीही धोक्यात

मात्र यावेळी ही कला त्याला चांगलीच महागात पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याने श्याम रंगीला अडचणीत सापडला आहे. त्याला राजस्थानच्या वन विभागाने नोटिस जारी केली आहे. यामध्ये त्याच्यावर वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. कारण नुकतच या मिमिक्री आर्टिस्टने जयपुरच्या झालाना जंगलामध्ये नील गाईला खाद्य पदार्थ खावू घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

जयपुर क्षेत्रीय वन अधिकारी जनेश्वर चौधरी यांनी सांगितलं की, यूट्यूब चॅनल श्याम रंगीलावर 13 एप्रिलला झालाना लॅपर्ड रिजर्वचा व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये आर्टिस्टने जयपुरच्या झालाना जंगलामध्ये नील गाईला खाद्य पदार्थ खावू घातल्याचं पाहायला मिळालं. पण वन्य प्राण्यांना खाद्य देणे वन अधिनियम 1953 आणि वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्याचे उल्लंघन आहे. वन्य जीवांना खाद्य पदार्थ खावू घालण्याने गंभीर आजार होऊ शकतात. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Tags

follow us