PM मोदींना जंगल सफारीत वाघ दिसलाच नाही; वाहन चालकावर ठपका, नोकरीही धोक्यात

PM Modi Safari News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिलला कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (PM Modi at Bandipur Tiger Reserve safari) गेले होते. पंतप्रधानही राखीव भागात सफारीवर गेले. पण मोदींना व्याघ्र प्रकल्पातील वाघ (Tiger)त्यांना काही दिसलाच नाही. त्यामुळे अर्थातच पंतप्रधान मोदी (PM Modi)नाराज झाले. भाजपच्या (BJP)काही नेत्यांनी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा ठपका वाहन चालकावर ठेवला. एवढंच नाही तर वाहनचालक मधुसूदनवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
Sanjay Raut : ”अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील असे वाटत नाही”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले होते. त्यानंतर ते जंगल सफारीला गेले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ दिसला नाही. त्यावेळी पीएम मोदींना हत्ती पाहायला मिळाले. यासोबतच काही रानगवे, ठिपकेदार हरीण आणि सांबरही पाहायला मिळाले.
“Spent the morning at the scenic Bandipur Tiger Reserve and got a glimpse of India’s wildlife, natural beauty and diversity,” tweets PM Narendra Modi pic.twitter.com/VrmCZUPtqY
— ANI (@ANI) April 9, 2023
एवढे सर्व प्राणी पाहायला मिळाले मात्र पंतप्रधान मोदींना वाघ काही शेवटपर्यंत दिसलाच नाही. त्याचं कारण त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीच सांगितले आहे. वास्तविक, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा तपासणी केली जाते. सर्व मार्ग आधीच ठरवले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधानांचे सुरक्षा रक्षक पाच दिवसांपूर्वीच बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात उपस्थित होते. एसपीजी, स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा पथके पाच दिवस याच मार्गावर अनेक वेळा सफारी करत होते. सुरक्षेच्या दृष्टीने एसपीजी टीमने वाघाचे फोटोही काढले होते.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at Bandipur Tiger Reserve in Karnataka pic.twitter.com/Gvr7xpZzug
— ANI (@ANI) April 9, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा रक्षकांच्या सततच्या सुरक्षा कवायतीमुळे त्या मार्गावर पीएम मोदींना वाघ दिसले नाहीत. सततच्या कवायती आणि वाहनांच्या हालचालीमुळे वाघ सुरक्षित ठिकाणी गेला. त्यामुळेच 9 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सफारीदरम्यान त्यांना एकही वाघ दिसला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये पीएम मोदींना वाघ न दिसल्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत विनोद करतानाही दिसले. पीएम मोदींनी एसपीजी सुरक्षा रक्षकांची खिल्ली उडवली की त्यांच्या सुरक्षा कवायतीमुळे वाघ निघून गेले आणि त्यांना ते दिसले नाही.
त्यानंतर पीएम मोदींना वाघ दाखवण्यासाठी दुसऱ्या मार्गावर जाण्याची चर्चा होती, मात्र एसपीजीने आपल्या निर्धारित मार्गावरून हटण्यास नकार दिला, अशीही चर्चा आहे.