कर्नाटकात आता बीपीएल रेशनकार्ड धारकांना अतिरिक्त पाच किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, तांदुळ उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ
कर्नाटक राज्यातील बीपीएलधारक कुटुंबांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ देण्यात येतो. या तांदळाच्या बदल्यात लोकांना आता सरकारकडून पैसे अदा करण्यात येणार असून त्याची तारीखही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
पुणे पुन्हा हादरलं! प्रियकराचं सुपारी देत अपहरण; विवाहित प्रेयसीने प्रेमाला घेऊन गाठलं गुजरात
दरम्यान, कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर सिद्धरामय्या सरकारला निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तांदुळ खरेदीचं मोठं आव्हान होतं. त्यामुळेच अतिरिक्त पाच किलो तांदुळ लाभार्थ्यांना 34 रुपये प्रतिकिलो रोख रक्कम देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
फॉर्म्युला ठरला! सिद्धीविनायक शिंदेंना, शिर्डी देवस्थान भाजपला, महामंडळांचे वाटप पूर्ण
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून बैठकीनंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी याबद्दल माहिती दिलीय.
अन्न भाग्य योजनेनूसार कुटुंबातील व्यक्तीला प्रतिकिलो 34 रुपये प्रमाणे पैसे देण्यात येणार असून प्रत्येक महिन्याला कुटुंबाला अतिरिक्त तांदळाऐवजी 170 रुपये मिळणार आहेत. रेशनकार्डामध्ये दोन व्यक्तींचा समावेश असल्यास त्यांना 340 तर पाच सदस्य असल्याचं 850 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मुनियप्पा यांनी दिली आहे.