Congress 5 Guarantees: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच सर्व कन्नडवासीयांचे त्यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली की कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही राज्यातील जनतेला पाच महत्त्वाची आश्वासने दिली होती. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या पक्षाला पूर्ण बहुमत दिले. त्यांच्यामुळे आज मी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकलो आहे. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन कर्नाटकच्या जनतेला भेट दिली आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चाललो, असे सिद्धरमय्या यांनी सांगितले.
काँग्रेसने पूर्ण केलेली पाच आश्वासने
1. 200 युनिटपर्यंत मोफत वीज
2. गरीब कुटुंबातील महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा 2 हजार
3. महिलांसाठी मोफत प्रवास
4. बेरोजगारांना दोन वर्षे भत्ता, पदवीधरांसाठी तीन हजार, डिप्लोमासाठी दीड हजार
5. बीपीएल कुटुंबांना दहा किलो तांदूळ मोफत
हवाई दलाचा मोठा निर्णय; वारंवार होणाऱ्या अपघातानंतर MIG-21 च्या उड्डाणावर बंदी
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रसने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला 19 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांच्याबरोबरच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
#WATCH | Former Congress president Sonia Gandhi thanked the people of Karnataka for electing Congress in the recently concluded assembly elections and assured them that the newly-formed govt will work on the path of development of the state. pic.twitter.com/cvqr76fyFz
— ANI (@ANI) May 20, 2023
काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, “कर्नाटकच्या जनतेचे मी आभार मानते ज्यांनी काँग्रेसच्या बाजूने जनादेश दिला. हा जनादेश विभाजन आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाच्या विरोधात आहे. काँग्रेस सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करेल.” राहुल गांधी म्हणाले की, आम्ही खोटी आश्वासने देत नाही. आम्ही तुम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ.