Download App

सिक्कीम पूर: लष्कराच्या 8 जवानांचे मृतदेह सापडले, राजनाथ सिंह यांनी केला शोक व्यक्त

Sikkim flash floods : काही दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये पुर (Sikkim flash floods) परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये 23 जवान बेपत्ता झाले होते. यानंतर या जवानांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता. आज शनिवारी या बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या तुकडीतील आठ लष्करी जवानांचे मृतदेह सापडल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सांगितले.

राजनाथ सिंह म्हणाले की, 23 बेपत्ता सैनिकांपैकी एकाला वाचवण्यात आले आहे, तर आठ शहीद सैनिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राष्ट्रसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचे बलिदान विसरता येणार नाही. उर्वरित 14 सैनिक आणि बेपत्ता नागरिकांसाठी शोध मोहीम सुरू असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. बुधवारी अचानक आलेल्या पुरानंतर सैनिक बेपत्ता झाले होते.

सिक्कीममधील तिस्ता नदीला ढगफुटीमुळे पूर आल्याने मृतांची संख्या 27 झाली आहे. दरम्यान, 141 बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव आणि राज्य मदत आयुक्त यांनी शनिवारी जारी केलेल्या अहवालानुसार, ढगफुटीमुळे आलेल्या महापुरात आठ सैनिकांसह 27 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 25,000 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. याशिवाय पुरामुळे 1200 हून अधिक घरांचे नुकसान झाले असून 13 पूल वाहून गेले आहेत.

आमचा डीएनए तपासायच्या आधी स्वत:चा डीएनए तपासा, तुमचा डीएन फिरोज…; अनिल बोंडेंची टीका

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी शनिवारी सांगितले की, ‘राज्यातील मंगन जिल्ह्यातील चुंगथांग येथील 1200 मेगावॅट धरण फुटल्यानंतर तीस्ता नदीला अचानक आलेल्या पुरामुळे सर्वात मोठे नुकसान झाले आहे.’ मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मंगणच्या नागा गावात पूरग्रस्त भाग आणि मदत शिबिरांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तेथील लोकांशी संवाद साधला.

Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस

सिक्कीम हिमालयातील ल्होनाक हिमनदीचा 3 ऑक्टोबर रोजी उद्रेक झाला. सरोवराचा एक किनारा तुटल्याने तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. सिक्कीम सरकारने सिंगतम, रंगपो, डिक्चू आणि आदर्श गावांमध्ये 18 मदत शिबिरे उभारली आहेत, ज्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, चुंगथांगशी संपर्क नसल्यामुळे तेथे भारतीय लष्कर आणि इतर निमलष्करी दलांकडून मदत छावण्या उभारल्या जात आहेत.

Tags

follow us