Sikkim New Population Policy : विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत असलेला चीन (China) हा लोकसंख्येच्या (population) बाबतीत जगात आघाडीवर होता. सर्वांधिक लोकसंख्येचा देश म्हणून तोरा मिरवणाऱ्या चीनचा भारताने आता रेकॉर्ड मोडला. तथापि, जगाच्या अनेक भागांमध्ये, नेमकी उलट समस्या तयार झाली आहे. अनेक देशांत लोकसंख्येत मोठी घड झाल्याचे दिसून येतं. याच घटत्या लोकसंख्येमुळे अनेक देश त्रस्त आहेत. भारतातही ही घटत्या लोकसंख्येची समस्या काही राज्यांतील सरकारांसाठी डोकेदुखी बनली आहे. यावर उपाय म्हणून आता सिक्कीम सरकारने एक अनोखी योजना सुरू केली आहे.
सिक्कीचा सरकारचा निर्णय
ही बातमी आहे ईशान्य भारतातील सिक्कीम राज्याची, जिथे राज्य सरकार लोकसंख्या आणि जन्मदर वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सिक्कीममधला प्रजनन दर देशात सर्वात कमी आहे. हा दर 1.1 एवढा आहे. याचा अर्थ असा आहे की, सिक्कीम राज्यातील महिला सरासरी एक मुल जन्माला घालते. राज्य सरकारच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळं सिक्कीम राज्यानं लोकसंख्या वाढीसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली आहे.
देशातील अनेक आदिवासी राज्यात आदिवासींची लोकसंख्या सातत्याने घसरत आहे. राज्य सरकारला याची काळजी आहे आणि सिक्कीमच्या मूळ रहिवाशांनी अधिकाधिक मुले निर्माण करावीत अशी त्यांची इच्छा आहे.
Karnataka Election Result : तरीही विजय आमचाच! भाजपाच्या ‘या’ नेत्याने मांडलं हटके गणित
…तर तुम्हाला हे फायदे मिळतील
त्यासाठी राज्यात प्रोत्साहनपर योजना सुरू आहेत. आता सरकारने प्रोत्साहन आणखी वाढवले आहे. नुकतीच सरकारने एक ताजी घोषणा केली आहे. ही घोषणा सिक्कीमच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. राज्यातील आदिवासींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी 1 जानेवारीपासून सरकारने नवीन योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत दोन किंवा तीन मुले असलेल्या कर्मचाऱ्यांना आगाऊ आणि अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय सिक्कीम राज्य सरकारने घेतला आहे.
सरकारी अधिसूचना जारी
या संदर्भात राज्य सरकारने या आठवड्यात अधिसूचना जारी केली. कार्मिक विभागाचे सचिव रिंजिंग चेवांग भुतिया यांनी 10 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत सांगितले की, सिक्कीम विषयाचे प्रमाणपत्र/ओळख प्रमाणपत्र धारण करणार्या राज्य सरकारी कर्मचार्यांना, ज्यांना दोन मुले आहेत त्यांना आगाऊ वेतनवाढ दिली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांना तीन मुले आहेत त्यांना वाढीव वेतनवाढ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.