Download App

सिंघम IPS शिवदीप लांडे, आता दिसणार नाही ‘पोलीस गणवेशात’, राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा

IPS Shivdeep Lande :  सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारे बिहारचे सिंघम आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांचा

  • Written By: Last Updated:

IPS Shivdeep Lande :  सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारे बिहारचे सिंघम आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी स्वीकारला असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. शिवदीप लांडे यांनी  19 सप्टेंबर 2024 रोजी सोशल मीडियावर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. 15 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.

शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सप्टेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर देखील काही दिवसांपूर्वी त्यांची पूर्णिया येथील पोलिस महानिरीक्षक पदावरून आयजी ट्रेनिंगमध्ये पटणा येथे बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मीडीयासह बिहारच्या राजकाणात चांगली चर्चा पाहायला मिळाली होती.

राजीनामा देताना बिहारला आपली कर्मभूमी म्हणून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र याबाबत स्वतः या चर्चांना पूर्णविराम देत राजकारणात येणार नसल्याची घोषणा केली होती.

Video : … आता मात्र भीती वाटायला लागलीये; सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेचं विधान चर्चेत

राजीनामा देताना शिवदीप लांडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, प्रिय बिहार, गेल्या 18 वर्षांपासून सरकारी पदावर काम केल्यानंतर, मी आज या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी कर्मचारी म्हणून मी काही चूक केली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. मी फक्त बिहारमध्येच राहीन. भविष्यातही बिहार माझी कर्मभूमी राहील, जय हिंद. असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

follow us