नवी दिल्ली : भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘डार्लिंग’ म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस नेत्यांवर दुसरी कारवाई आहे. मागील आठवड्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.
युवक काँग्रेसचे दुसरे मोठे नेते बी. श्रीनिवास यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना’डार्लिंग’ म्हणून संबोधले आहे. या अवमानकारक वक्तव्या प्रकरणी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख यांनी अमीत मालवीय यांनी बी. श्रीनिवास यांना तक्रार केली आहे. मालवीय यांनी नोटीस पाठवली असून, त्यात श्रीनिवास यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.
We are at it Chief. We have an absolute faith on our Judicial process and we will make sure that a deterrent is set for such Fake factory operators.@IYC @Allavaru @srinivasiyc
@RoopeshSinghINC https://t.co/INThJZB9Jc— IYC Legal Cell (@IYCLegalCell) March 29, 2023
स्मृती इराणी यांच्याबाबत युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर नोटीस पाठवत माफीची मागणी केली आहे.
Karnataka Election : निवडणुकांपूर्वीच भाजपला धक्का; दिग्गज नेत्याची रणधूमाळीतून माघार! – Letsupp
जेव्हा गॅस सिलिंडरची किंमत ४०० रुपये होती. तेव्हा स्मृती इराणी या ‘महागाई डायन’ म्हणून टीका करत होत्या. आता सिलिंडरची ११०० रुपये झाली आहे. तेव्हा आता या स्मृती इराणी ‘डायन’ या ‘डार्लिंग’ झाली आहे, असे विधान युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास यांनी केले होते. त्यावर आक्षेप घेत हे विधान स्मृती इराणी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केले आहे, असे सांगत तक्रार दाखल केली आहे.
(244) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube