Download App

10 वेळा पक्ष बदलणारेच घुसखोर! इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिलवर संतापलेल्या राऊतांचा संसदेत चुटक्या वाजवत हल्लाबोल

Snjay Raut यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.

Snjay Raut Angry on Immigration and Foreigners Bill issue in Parleament : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर (Waqf Board Bill ) संसदेत सध्या चर्चा सुरु असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या विधेयकावरुन धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चर्चेदरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. तसेच यावेळी राऊत भाषणाला उभे राहिले. आता सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बेंच वाचवले तसेच बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. त्यावर संजय राऊत यांनी थेट चुटक्या वाजवत विरोधकांना गप्प केलं.

काय म्हणाले संजय राऊत?

इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयक देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हटले की हा देश म्हणजे धर्मशाळा नाही त्याला धर्मशाळा बनू देणार नाही. मात्र हा देश एक जेल देखील नाही. यावेळी संसदेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख होताच राऊत यांनी चुटक्या वाजवत सत्ताधारी खासदारांना चांगले खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, तुम्ही 10 वेळा पक्ष बदलणारे लोक आहात तुम्हीच घुसखोर आहात.

वक्फ बोर्डाचं सशक्तीकरण की ताबा मिळवण्याचा डाव? खासदार निलेश लंके आक्रमक

पुढे राऊत म्हणाले, गेल्या दहा वर्षात वैध पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या लोकांना देखील जेलमध्ये ठेवण्यात आला आहे.देशात कोणीही बेकायदेशीर राहू नये. हे आम्हाला देखील वाटतं. मात्र यामध्ये सरकार परदेशातून विरोधकांना भेटायला आलेल्या लोकांना देखील भेटण्याची परवानगी द्यायची की नाही. यावर नियंत्रण मेरी इच्छित आहे. त्यामुळे हा कायदा देशाला जेल बनवायची आहे असं मला वाटतं.

follow us