ती बीडची म्हणून जर… सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे संतापले
Dhananjay Munde यांनी साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याच्या घटनेवरून प्रशासनावर संताप व्यक्त केला.
If she is from Beed… Dhananjay Munde angry over Satara doctor suicide case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलीस प्रशासनासह लोकप्रतिनिधी विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामध्येच आता ही मृत महिला डॉक्टर बीडची असल्याने तिच्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असल्याचं बोलले जात आहे. यावर आता माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर त्यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या अकालीन निधनाने कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेतील दोषींना कठोर शासनाने तसेच ती बीडची आहे. म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे. संपूर्ण प्रकरणाचे स्वतंत्र एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच हे प्रकरण जलद गती न्यायालयाने चालवावे व दोशींना कडक शासन व्हावे. याबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. असे देखील मुंडे यावेळी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
ताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये खासदाराचे पीए तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी खासदारांना फोन लावून दिला असता त्यांनी देखील तिच्याशी बोलने केले होते. असा आरोप केला आहे.
अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत,‘अभंग तुकाराम’ची चाहत्यांसाठी अनोखी भेट !
दरम्यान यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.त्यानंतर आता थेट फलटण भागातील खासदारांचे नाव देखील यामध्ये या महिला डॉक्टरच्या भावाने केले आहे. त्यामुळे नाव न समोर आलेले हे खासदार कोण? अशा अनेक प्रश्नांना या प्रकरणाने तोंड फोडले आहे.
