सोनम वांगचुक यांचा उपचारास नकार; सफदरगंजच्या डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटीन जारी

उपोषण मागं घ्यावे अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत होती. सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

News Photo   2026 07 18T161151.710

सोनम वांगचुक यांचा उपचार घेण्यास नकार; सफदरगंजच्या डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटीन जारी

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात उपोषण सुरु केल्यानंतर आज 21 व्या दिवशी त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केलं आहे. सोनम वांगचुक यांनी आता रुग्णालयात औषध घेण्यास नकार दिला आहे. वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ बुलेटीन जारी केलं आहे.

वांगचूक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेली 21 दिवस जंतरमंतरवर उपोषण केलं होतं. त्यांचं वजन प्रचंड घटल्याने त्यांनी उपोषण मागं घ्यावे अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत होती. सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आपण आणखी काही दिवस अन्नावाचून राहू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आज शनिवारी दिली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरुन उचलून त्यांची रवानगी दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात केली. त्यांना उचलून अँब्यूलन्समधून थेट रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गदारोळ झाला.

Exit mobile version