‘कोणी डॉक्टर तर कोणी अभिनेता’; मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात या चेहऱ्यांचा समावेश

Chief Minister Vijay's cabinet अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची पहिली यादीही जाहीर केली आहे.

अभिनयाला रामराम अन् राजकारण फूलटाइम; थलपती विजयने पक्षाचा झेंडा केला जाहीर

अभिनयाला रामराम अन् राजकारण फूलटाइम; थलपती विजयने पक्षाचा झेंडा केला जाहीर

‘Some are doctors, some are actors’; These faces are included in Chief Minister Vijay’s cabinet : तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. थलपती विजय यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये त्यांनी राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची पहिली यादीही जाहीर केली आहे.

एसटीतील अश्लील कृत्याचा cctv व्हायरल! नगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादच्या विरोधात रास्ता रोको

या नव्या मंत्रिमंडळात 29 वर्षीय आमदारालाही संधी देण्यात आली असून, ते सर्वात तरुण मंत्री ठरले आहेत. याशिवाय एका डॉक्टर, एका दंतवैद्य, माजी IRS अधिकाऱ्यासह आणखी सहा नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. पहिल्या यादीतील सर्व मंत्री ‘तमिळगा वेट्री कळघम’ (TVK) पक्षाचे आहेत. विशेष म्हणजे, या यादीत काँग्रेसच्या एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही.

एन. आनंद

विजय यांनी पक्ष स्थापन करण्यापूर्वीच एन. आनंद हे त्यांच्या फॅन क्लब असोसिएशनचे अध्यक्ष होते. विजय यांनी ‘तमिळगा वेट्री कळघम’ (TVK) पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्यात आनंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना पक्षाचे पहिले महासचिव बनवण्यात आले आणि आजही ते त्याच पदावर कार्यरत आहेत.

एन. आनंद हे पक्षाचे प्रमुख प्रवक्तेही मानले जातात. 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उघडपणे सांगितले होते की, TVK चाच नेता तामिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री होणार. त्यांनी चेन्नईतील त्यागरायनगर मतदारसंघातून निवडणूक लढवून DMK चे उमेदवार राजा अन्बाझगन यांचा पराभव केला.

आधव अर्जुन

सुमारे 6 फूट 7 इंच उंचीचे आधव अर्जुन हे माजी राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहेत. ते तामिळनाडूमधील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार, समाजसेवक आणि क्रीडा प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. मागील निवडणुकांमध्ये त्यांचे नाव एम.के. स्टॅलिन यांच्याशी जोडले गेले होते आणि DMK च्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.

2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चेन्नईतील विलिवक्कम मतदारसंघातून विजय मिळवला. TVK मध्ये ते निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे महासचिव आहेत. विजय आणि एन. आनंद यांच्यानंतर त्यांना पक्षातील तिसरे सर्वात प्रभावशाली नेते मानले जाते. ते ‘बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्षही आहेत.

एस. कीर्तना

तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये यंदा दिवाळीचा आनंद लवकर आल्याची भावना व्यक्त केली जात आहे आणि त्याचे कारण म्हणजे 29 वर्षीय अभिनेत्री व आमदार एस. कीर्तना. त्या आता मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरणार आहेत.

एस. कीर्तना या TVK च्या आमदार असून त्यांनी शिवकाशी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हिंदी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. त्या दीर्घकाळापासून तळागाळातील राजकारणाशी जोडलेल्या आहेत. त्यांनी राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले असून पक्षाची निवडणूक रणनीती तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्याकडे गणित विषयात BSc आणि सांख्यिकीमध्ये MSc पदवी आहे. शिवकाशीतील फटाका उद्योगातील कामगारांसाठी नियमित आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच महिलांना समान वेतन मिळवून देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

डॉ. टी.के. प्रभू

TVK चे प्रमुख नेते डॉ. टी.के. प्रभू हे व्यवसायाने दंतचिकित्सक आहेत. त्यांनी कराईकुडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

के.ए. सेंगोत्तैयान

के.ए. सेंगोत्तैयान हे AIADMK पक्षातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. गेल्या वर्षी त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. जवळपास 50 वर्षे त्यांनी AIADMK सोबत काम केले होते. नंतर त्यांनी विजय यांच्या TVK पक्षात प्रवेश केला.

पी. वेंकटरमणन

पहिल्यांदाच आमदार बनलेले पी. वेंकटरमणन हे TVK चे कोषाध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी चेन्नईतील महत्त्वाच्या मायलापूर मतदारसंघातून विजय मिळवला. राजकारणात त्यांची एंट्री नवी असली तरी ते दीर्घकाळ विजय यांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. 2000 सालापासून त्यांनी अभिनेता विजय यांचे व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.

निर्मल कुमार

निर्मल कुमार हे TVK मध्ये आयटी आणि सोशल मीडिया विभागाचे उपमहासचिव आहेत. त्यांनी मदुराई जिल्ह्यातील तिरुप्परनकुंड्रम मतदारसंघातून विजय मिळवत स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली आहे.

राजमोहन अरुमुगम

राजमोहन अरुमुगम हे अभिनेता, स्टँड-अप कॉमेडियन आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक क्षेत्रांत सक्रिय असलेल्या राजमोहन यांनी चेन्नईतील एग्मोर मतदारसंघातून विजय मिळवला असून आता ते विजय यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

Exit mobile version