एसटीतील अश्लील कृत्याचा cctv व्हायरल! नगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादच्या विरोधात रास्ता रोको

travel jihad in Ahilyanagar एसटी बसमध्ये महिलेसोबत अश्लील कृत्याचा संबंधित कंडक्टर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले.

Travel Jihad

CCTV of obscene act in ST goes viral! Road blockade against travel jihad in the city : अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल्स जिहाद विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅली काढण्यात आली होती. दरम्यान या आंदोलनामुळे नगर पुणे तसेच नगर संभाजीनगर महामार्गवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.

राजा शिवाजीने दुसऱ्या आठवड्यातही ₹75 कोटींचा टप्पा ओलांडला

एसटी महामंडळाच्या एका बसमध्ये महिलेसोबत अश्लील कृत्य करत असल्याचा संबंधित कंडक्टर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील व्यक्ती हा एसटी बसमधील कंडक्टर असल्याचे सांगण्यात आले असून संबंधित कंडक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

कादंबरीतील ‘चिरंजीव अश्वत्थामा’ या कादंबरीतील अश्वत्थामा रंगभूमीवर अवतरला आहे

खरंतर बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने संबंधित कंडक्टर महिलेसोबत अश्लील कृत्य करताना आढळून आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून तों व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि रास्ता रोको थांबविण्यात आला.

सचिन पिळगांवकरांनी धुरंधरमधील रणवीर सिंहच्या अभिनयाचं कौतुक करत त्याच्या संयमाला म्हटलं “लाजवाब”

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत प्रतिक्रिया दिली.ज्या पद्धतीने लोरेन्स बिष्णोई समाजासाठी स्वतः कायदा करून निर्णय घेतो, त्याच पद्धतीने आता हिंदू समाजालाही स्वतःचा कायदा करावा लागेल असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच काही लोकांना जशास तसे उत्तर दिल्यानंतरच ते शांत होतात आणि बिष्णोईने देखील तेच केल्याने सगळे शांत झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

follow us