डिझेल 3 रुपयांनी वाढले, एसटीला वर्षाला 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार
Diesel price hiked ST डिझेल दरात 3 रुपये इतकी वाढ वाढ झाली असून त्यामुळे वर्षाला अंदाजे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार
Diesel price hiked by Rs 3, ST will suffer an additional loss of Rs 124 crore per year : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात 3.11 ने म्हणजेच सरासरी प्रति लिटरला 3 रुपये इतकी वाढ वाढ झाली असून त्यामुळे वर्षाला अंदाजे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार असून राजस्थान सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करात सूट दिली नाही तर एसटीला मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल यात तिळमात्र शंका नाही असा अंदाज महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे.
एसटीला दररोज सरासरी 10 लाख 87 हजार लिटर इतके डिझेल लागत असून इंधनावर वर्षाला सरासरी 3 हजार 400 कोटी रुपये इतका खर्च होत आहे.मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी व महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर 21 टक्के इतका असल्याने व त्या तुलनेत गुजरात मध्ये मूल्यवर्धित कर 14.9 टक्के इतका कमी असल्याने महामंडळाच्या फायद्याचा दृष्टीने गुजरात मधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी घेतला होता.
ती फाईल सरकारकडून मंजूर करण्यात आली असून त्यातून 251 डिझेल पंपापैकी 94 पंपावर लागणारे डिझेल कमी दरात मिळेल.पण तो दर सुद्धा देशभरात दर वाढल्याने वाढणारच आहे. फक्त तो महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल.उरलेल्या 157 डिझेल पंपातून वर्षाला 20 कोटी लिटर इतके डिझेल लागणार असून सद्या एसटीला सरासरी 88 रुपये प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करावी लागत असून त्यात आता तीन रुपयांनी वाढ होणार आहे.तो दर आता प्रति लिटरला 91 रुपये इतका होणार आहे.
मोठी बातमी! NEET परीक्षेची नवीन तारीख जाहीर; 21 जून रोजी होणार परीक्षा
एसटी ही सार्वजनिक वाहतूक असल्याने तिला मदत व्हावी यासाठी राज्यस्थान सरकारने तिथल्या एसटीच्या इंधन दर खरेदी मूल्यवर्धित करात सूट दिली असून सद्या राज्यस्थान मध्ये 18.5 टक्के इतका मूल्यवर्धित कर असला तरी तिथल्या एसटीला त्यात सूट मिळाली असून तो 14 टक्के इतका आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करातून सूट दिली पाहिजे अन्यथा 12000 कोटी रुपयांचा संचित तोटा व 5000 कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत असलेल्या एसटीसाठी ही धोक्याची घंटा ठरेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.