तब्बल 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; PM मोदींच्या आवाहनानंतर देशात खळबळ

Narendra Modi : हैदराबाद येथे एका जाहीर सभेत बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे

Narendra Modi

Narendra Modi : हैदराबाद येथे एका जाहीर सभेत बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम करण्याचे आवाहन केल्यानंतर गुजरातमध्ये बोलताना शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असं म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर चारीही बाजूने जोरदार हल्ले सुरु केले आहे. तर दुसरीकडे मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात तब्बल एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात असल्याचा दावा ज्वेलरी असोसिएशनकडून करण्यात आला आहे. याच मुद्यावरून आज जीसेजीचे पदाधिकारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे.

हैदराबाद (Hyderabad) येथे बोलताना पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी भारतीयांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. मोदी यांच्या या आवाहनानंतर सोन्याच्या मागणीत मोठी घट होऊ शकते ज्याचा थेट परिणाम अनेकांच्या रोजगारावर आणि व्यवसायावर होण्याची भीती सराफांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जर सोने खरेदी पूर्णपणे ठप्प झाली तर एक कोटींहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार असा दावा देखील जीजेसीकडून करण्यात आला आहे.

जीजेसीकडून (GJC) देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ज्वेलरी उद्योगाची वार्षिक उलाढाल जवळपास 10 दहा लाख कोटी रुपये पण पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर या उलाढालीत थेट 30 टक्के म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हैदराबाद येथे पंतप्रधान मोदी यांनी देशाला केलेली आवहनं

पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा

सार्वजनिक वाहतूक वापरा

वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या

खाद्यतेलाचा वापर कमी करा

स्वदेशी उत्पादनं वापरा

विदेशी प्रवास टाळा

एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित-

नैसर्गिक शेतीचा अवलंब करा

follow us