15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ते परीक्षेचं शहर निवडता येणार! NEET च्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

Union Education Minister NEET students केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET च्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Union Education Minister NEET Students

15 minutes extra time to choose exam city Union Education Minister Dharmendra Pradhan’s big announcement for NEET students : NEET परीक्षेला बसणाऱ्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती मात्र पेपर फुटल्यामूळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता ही परीक्षा पुढील वर्षीपासून ऑनलाईन होणार असल्याचं देखील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर यासह अनेक मोठ्या घोषणा प्रधान यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठा घोषणा केल्या आहेत.

ब्रेकिंग : पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार; धर्मेद्र प्रधान यांची मोठी घोषणा

आज शुक्रवार 15 मे 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी NEET 2026 परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. देशभरात पेपरफुटीच्या आरोपांमुळे भारतातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेली NEET 2026 रद्द करण्यात आली होती. या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. त्यानंतर सरकारने पुनर्परीक्षेची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा शहर निवडीची संधी

धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, NEET पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा शहर निवडण्याची मुभा दिली जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ताण कमी होणार असून, पुनर्परीक्षा प्रक्रिया अधिक सोयीची होईल. परीक्षा रद्द झाल्याने पुन्हा बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

14 जूनपर्यंत प्रवेशपत्र उपलब्ध

मंत्र्यांनी स्पष्ट केले की, NEET पुनर्परीक्षेची नवी प्रवेशपत्रे 14 जून 2026 पर्यंत NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थी त्यांच्या आधीच्या अर्ज क्रमांक आणि लॉगिन तपशीलांचा वापर करून नवीन हॉलतिकीट डाउनलोड करू शकतील.

नवीन नोंदणीची गरज नाही

तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. आधीच्या अर्जातील सर्व माहिती, उमेदवारी तपशील आणि परीक्षा केंद्राशी संबंधित नोंदी वैध राहतील. पुनर्परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा रद्द होण्यापूर्वी सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी NEET 2026 दिली होती. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून पुनर्परीक्षा तातडीने घेण्याचे नियोजन केले जात आहे.

पेपरफुटीप्रकरणी चौकशी सुरू

पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI) कडे सोपवली आहे. विविध तपास यंत्रणा सध्या संभाव्य लीक मार्गांचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका प्रसारित होणे, मुद्रण प्रक्रियेतील त्रुटी आणि परीक्षा साखळीतील अंतर्गत कमकुवत दुवे यांचा तपास सुरू आहे.

शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे गैरसोय होत असली तरी, स्पर्धा परीक्षांमध्ये न्याय आणि निष्पक्षता राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले. NEET पुनर्परीक्षेची तारीख, शहर निवड प्रक्रिया आणि संपूर्ण वेळापत्रकाबाबतची अधिकृत माहिती लवकरच NTA पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे.

follow us