Download App

सोनिया गांधी अन् राहुल गांधींनी मतदान केले, पण काँग्रेसला नाहीच… जाणून घ्या कारण

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नवी दिल्ली येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दोघांनीही नवी दिल्लीतल्या (New Delhi) निर्माण भवनमधल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मात्र यावेळची एक विशेष गोष्ट म्हणजे या दोघांनाही काँग्रेसला मतदान करता आलेले नाही. (Sonia Gandhi and Rahul Gandhi have not been able to vote for Congress.)

“शहांचा राज्यपालपदाचा शब्द, दरेकरांनी विनाकारण बोलू नये”; किर्तीकरांसाठी अडसूळ मैदानात

त्याचे झाले असे की, दिल्लीमध्ये आम आदमा पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. यात आम आदमी पार्टी नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या चार जागांवर निवडणूक लढवत आहे. तर ईशान्य, उत्तर पश्चिम आणि चांदनी चौक या तीन मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत.

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांना अटक

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मतदान हे नवी दिल्ली मतदारसंघात आहे. इथे आम आदमी पक्षाकडून सोमनाथ भारती उमेदवार आहेत. तर विरोधात भाजपकडून दिवगंत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांना मैदानात उतरविले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नसल्याने या दोघांनाही काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.

follow us