दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीमधील (Delhi) सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. रुग्णालय प्रशासनाने याविषयी माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू (Dr. Arup Basu) आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली. सर गंगाराम रुग्णालय प्रशासनाने माहिती देत सांगितलं आहे की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या विविध प्रकारच्या चाचण्या सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने यावेळी सांगितलं आहे. सोनिया गांधी यांना ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना सध्या ७६ वर्षांच्या आहेत. त्यांना गुरुवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. चेस्ट मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.