सोनिया गांधींच्या ‘Belonging: A Journey of Love’ आत्मचरित्र 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार; नवा प्रकाशक कोण ?

Belonging: A Journey of Love - Sonia Gandhi : . पेंग्विन रँडम हाऊस इंडिया नंतर आता हार्परकॉलिन्स इंडिया हे पुस्तक भारतात प्रकाशित करणार आहे.

Sonai Gandhi

Sonai Gandhi

Belonging: A Journey of Love – Sonia Gandhi : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाला भारतात नवा प्रकाशक मिळाला आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (Penguin Random House India) नंतर आता हार्परकॉलिन्स इंडिया (HarperCollins India) हे पुस्तक भारतात प्रकाशित करणार आहे. या आत्मचरित्राचे भारतातील प्रकाशन 10 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.


‘लहानपणापासून प्रश्न पडत होते, पुस्तकांनी स्पष्टता दिली’; विद्यानंद बापटांचा नास्तिकतेबाबत मोठा खुलासा

Penguin Random House ने का घेतली माघार?
गेल्या आठवड्यात पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने आपण सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचे भारतातील प्रकाशक नसल्याचे स्पष्ट केले होते. सोनिया गांधी यांनी सुचवलेल्या संपादकीय बदलात करण्यास नकार दिल्यामुळे प्रकाशकाने पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय मागे घेतला होता. पेंग्विन रँडम हाऊसवर पुस्तकात बदल करण्यास दबाव असल्याची चर्चा होती. पण कोणताही बाह्य दबाव नसल्याचेही पेंग्विन हाऊसने जाहीर केले होते.


हिंजवडीच्या PCMC समावेशाला वेग; राहुल कलाटेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, 1-3-5 वर्षांचा रोडमॅप जाहीर करण्याची मागणी


आत्मचरित्रात काय आहे?

सोनिया गांधी यांनी एक पुस्तकाबाबत एक निवेदन काढले होते. या पुस्तकात कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. 1984 मध्ये त्यांच्या सासू आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि 1991 मध्ये त्यांचीही हत्या झाली. या वैयक्तिक धक्क्यांनंतर सोनिया गांधी हळूहळू सक्रिय राजकारणात आल्या. त्या काँग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तींपैकी एक ठरल्या. काँग्रेसकडून पंतप्रधानपदाची संधी मिळूनही त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यांच्या आत्मचरित्रामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच भारतीय राजकारणातील गेल्या सहा दशकांतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवरही नवा दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version