Rahul Gandhi जाणार सोनिया गांधींच्या घरी राहायला!

Rahul Gandhi-New Delhi : राहुल गांधी यांना सरकारी बंगला खाली करायला सांगितला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कुठे राहायला जाणार याची सुरु आहे. मात्र, आता ला चर्चेला राहुल गांधी यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील घरी राहायला जाणार आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांनी राहुल गांधी यांना सोनिया […]

Rahul Soniya Priyanka Gandhi

Rahul Soniya Priyanka Gandhi

Rahul Gandhi-New Delhi : राहुल गांधी यांना सरकारी बंगला खाली करायला सांगितला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कुठे राहायला जाणार याची सुरु आहे. मात्र, आता ला चर्चेला राहुल गांधी यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील घरी राहायला जाणार आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांनी राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांच्या घरी राहायला जाण्याचा सल्ला दिला होता.
Nitin Deshmukh : ओरिजिनल दूध प्यायला असाल तर ठाकरेंना अडवून दाखवा – Letsupp
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने २३ मार्च रोजी मोदी आडनावाची बदनामी केली म्हणून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्या पुढील दिवसात लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. तर २७ मार्चला लोकसभा सचिवालयाने बंगला खाली करण्यास सांगितले. नोटिस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी या सरकारी बंगल्याबाबत अनेक आठवणी असल्याचे सांगितले. 

सन २००४ साली अमेठी लोकसभा जिंकल्यानंतर २००५ मध्ये राहुल गांधी यांना हा बंगला देण्यात आला होता. तेव्हापासून म्हणजे गेली १७-१८ वर्षे ते या बंगल्यात राहत होते. २७ मार्चला लोकसभा हाऊसिंग कमेटीने १२ तुगलक रस्त्यावरील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश दिले आहेत. बंगला खाली करण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत वेळ दिली आहे. नोटिस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाचे उपसचिव डॉ. मोहित रंजन यांना बंगला खाली करण्यासंदर्भात कळवले होते.

राहुल गांधी यांनी आपल्या उत्तरात लिहिले आहे, की मी ४ वेळा लोकसभा सदस्य आहे. परंतु, हा लोकसभा सचिवालयाचा आदेश आहे. त्यांचा मी आदर करतो. माझ्या या बंगल्याशी अनेक आठवणी या जोडल्या गेल्या आहेत. मात्र, मी नोटीसीचे पालन करणार असून दिलेल्या मुदतीपूर्वी  बगंला खाली करत आहे.
Exit mobile version