PM Modi On Maha Kumbh 2025 : पंतप्रधान मोदी यांनी आज संसदेत भाषण केले. संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये नुकत्याच झालेल्या महाकुंभच्या यशाचा उल्लेख केला. (Maha Kumbh) लोकसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ज्या पद्धतीने महाकुंभ पार पडला, त्यासाठी मी देशातील नागरिकांना नतमस्तक होतो. महाकुंभदरम्यान संपूर्ण जगाने भारताची भव्यता पाहिली, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पाकिस्तान सुधारणार नाही, PM मोदी यांच्या नाराजीचं कारण काय? चीन आणि ट्रम्प
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोदींनी आज भाषण केले. संसदेत बोलताना त्यांनी महाकुंभच्या यशाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी महाकुंभमध्ये योगदान देणाऱ्या देशातील कोट्यवधी लोकांना अभिवादनही केले. लोकसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ज्या पद्धतीने महाकुंभ पार पडला, त्यासाठी मी देशातील नागरिकांना नतमस्तक होतो. महाकुंभदरम्यान संपूर्ण जगाने भारताची एकता पाहिली असंही ते म्हणाले.
भारत 1000 वर्षांसाठी तयार होत आहे
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने आपल्याला हे जाणवून दिले की, देश पुढील 1000 वर्षांसाठी कसा तयार होत आहे. या वर्षी महाकुंभने आपल्या विचारांना बळ दिले आहे आणि देशाची सामूहिक चेतना आपल्याला देशाच्या सामर्थ्याबद्दल सांगते.
काही लोकांच्या मनात असलेल्या शंकांनाही महाकुंभाने उत्तर दिल्याचे ते म्हणाले. अयोध्येतील राम लालाच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी, देश पुढील एक हजार वर्षांसाठी कसा तयार होत आहे हे आपण पाहिले. मग आपण हे महाकुंभात पाहिलं. कोणत्याही राष्ट्राच्या जीवनात असे अनेक टर्निंग पॉइंट्स येतात, जे शतकानुशतके उदाहरण बनतात. आपल्या देशाच्या इतिहासात असे काही क्षण आले आहेत, ज्यांनी एक नवी दिशा दिली किंवा सर्वांना धक्का दिला आणि जागृत केले. भक्ती चळवळीच्या काळात प्रत्येक कोपऱ्यात अध्यात्मिक चैतन्य असल्याचे आपण पाहिले. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे दिलेले भाषण हे भारताच्या चेतनेचे पैन असावे. स्वातंत्र्यलढ्यातही असेच झाले. 1857 ची क्रांती, सुभाषजींची दिल्ली चलो नारा आणि गांधीजींची दांडी मार्च. या सर्वांनी आम्हाला प्रेरणा दिली असंही मोदी यावेळी म्हणाले.