Download App

कुलगाममध्ये चकमक! दोन दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सैन्यदलाचं मोठं यश

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाईप भागात चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम (Jammu Kashmir) जिल्ह्यातील रेडवानी पाईप (Kulgam Encounter) भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या पथकात जोरदार गोळीबार सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा कुलगामच्या रेडवानी गावात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली.

या शोध मोहिमेचे पुढे चकमकीत रूपांतर झाले. मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दहशतवादी लपून बसलेल्या घराला आग लागली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की चकमकीच्या ठिकाणी दोन मृतदेह आधळून आले. मृतदेह ताब्यात आल्यानंतर ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख स्पष्ट होऊ शकते.

मणिपुरात पुन्हा आगडोंब! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल, हजारो काडतुसे पळविली

सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांनी गावाला वेढा घातला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सैनिकांचा वेढा तोडण्यासाठी त्यांनी प्रथम त्यांच्या रायफल ग्रेनेड डागले आणि नंतर सात सुरक्षा दलांनी स्वतः ला वाचवत प्रत्युत्तर दिले. यानंतर जोरदार धुमश्चक्रीला सुरुवात झाली.

संबंधित अधिाऱ्यांनी सांगितले की चकमकीच्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. चकमकीच्या ठिकाणी चारही बाजूंनी वेढा घातला आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. कोणताही दशहतवादी मारला गेला किंवा जखमी झाला याची खात्री करण्यास मात्र नकार देण्यात आला. ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही असेही सांगितले. काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात वाढ झाली आहे. याआधी मागील आठवड्यात पूंछ भागात दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता.

Jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर शनिवारी (दि.4) दहशवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद तर, चार जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या हल्लेखोरांचा भारतीय लष्कराकडून कसून शोध घेतला जात असून, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे सुरक्षा दलाकडून जारी करण्यात आली आहेत.

follow us