मणिपुरात पुन्हा आगडोंब! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल, हजारो काडतुसे पळविली

मणिपुरात पुन्हा आगडोंब! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल, हजारो काडतुसे पळविली

Manipur Violence : गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून धुमसत असलेलं मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना रोजच कानावर येत आहेत. आताही राज्यात पुन्हा मोठा आगडोंब उसळला आहे. मागील 24 तासांत राज्यात अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यातील नारनसैना येथे असलेले पोलिसांचे शस्त्रागार आक्रमक जमावाने शुक्रवारी लुटले. या शस्त्रागारातील एके रायफली आणि हजारो काडतुसे लुटून नेली. या जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मेईतेई समुदायाच्या तीन जणांची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर संतापलेल्या समुदायाच्या लोकांनी काही घरांना आग लावली.

नूहच्या हिंसाचारग्रस्त भागात कर्फ्यू, 6 जिल्ह्यांत तणावपूर्ण स्थिती, पोलिसांची करडी नजर

जमावाने बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलीस ठाण्यांवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा लुटल्याचे समोर आले आहे. जमावाने 235 असॉल्ट रायफल, 21 सब मशीन गन, 16 पिस्तूल आणि जवळपाल 9 हजार काडतुस असा दारुगोळा लुटला. कुकी झोमी जमातीच्या लोकांच्या सामुदायिक दफनविधीला मेईतेई समुदायाच्या लोकांनी विरोध केला होता. त्यावेळीही लष्कर, आरएएफच्या सैनिकांशी मणिपूरमधील निदर्शकांची चकमक झाली होती. यानंतर जमावाने राजधानी इंफाळ शहरातील शस्त्रागारे लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

राज्यात मागील 3 मे पासून हिंसाचार उसळला आहे. मेईतेई आणि कुकी समुदायातील या हिंसाचारात आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजारांपेक्षा आधिक लोक जखमी झाले आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे हिंसाचार रोखण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. आता तर पोलिसांची शस्त्रागारे लुटण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. या घटनांनी राज्यातील तणाव प्रचंड वाढला आहे.

लोकसभेच्या खासदारांनी ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहावं; भाजपकडून तीन ओळींचा व्हिप

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube