नूहच्या हिंसाचारग्रस्त भागात कर्फ्यू, 6 जिल्ह्यांत तणावपूर्ण स्थिती, पोलिसांची करडी नजर
Hariyana Violence : जवळपास तीन दशकांनंतर हरियाणातील नूहमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. याधी अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावरून हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नूहमध्ये हिंसाचाराचा तांडव पाहायला मिळालं. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने काढलेल्या जलाभिषेक यात्रेदरम्यान हा हिंसाचार झाला. नूह येथील हिंसाचारानंतर राज्यातील गुरुग्राम, फरीदाबाद, पलवल, झज्जर, यमुनानगर आणि जिंद हे सहा जिल्हे तणावाच्या परिस्थितीत असल्याचं घोषित करण्यात आले आहेत. (6 sensitive districts of Haryana apart from Nuh the situation in these areas is tense DC SP on high alert)
नूह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर अजूनही तेथे तणावाचे वातावरण आहे. या तणावाचा परिणाम आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. नूह व्यतिरिक्त गुडगाव, फरीदाबाद आणि पलवल जिल्ह्यांतील काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मंगळवारी यमुनानगर आणि जिंदसह काही ठिकाणी तुरळक घटना घडल्या. या हिंसाचारात आतापर्यंत दोन पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नूहमधील अतिसंवेदनशील भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
डीसी-एसपींना सतर्क राहण्याच्या सूचना
नूह व्यतिरिक्त, गुरुग्राम, फरिदाबाद, पलवल आणि झज्जर जिल्हे संवेदनशील म्हणून लक्षात घेऊन, गृह विभागाने या जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जिल्ह्यांतील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही परिस्थिती बिघडल्यास कर्फ्यू लावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
10 वर्षांनंतर उनाडकटचे वनडेत पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्धच शेवटचा सामना खेळला होता
प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवा
प्रत्येक किरकोळ घटनेवर लक्ष ठेवण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. गृहविभागाच्या वतीने अन्य जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट समाजाची किंवा वर्गाची गर्दी कुठेही जमू नये, अशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल आणि गृहमंत्री अनिल विज हे संवेदनशील जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांकडून मिनिटा-मिनिटाचा अहवाल घेत आहेत. डीजीपी पीके अग्रवाल आणि सीआयडी प्रमुख आलोक मित्तल सोमवारपासून या भागात तळ ठोकून आहेत. अनेक शहरांमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे.
उद्या शाळा बंद राहतील
दुसरीकडे, गुरुग्रामच्या सोहना येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर डीसीने बुधवारीही तेथील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी नूह येथे ब्रिजमंडल धार्मिक यात्रेदरम्यान दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. तेव्हापासून पोलीस हाय अलर्टवर आहेत. नूह येथील प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चौकाचौकात, गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक इमारतींजवळ पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुढील आदेशापर्यंत नूह पोलिस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे आदेश सरकारने भिवानीचे एसपी नरेंद्र सिंह बिजार्निया यांना जारी केले आहेत. बिजार्निया याआधीही नूहमध्ये राहत आहेत. ते अत्यंत कडक अधिकारी मानले जातात.