Download App

GST Council : राज्यांना 5 वर्षांचा संपूर्ण जीएसटी दिला जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची 49 वी बैठक आज नवी दिल्लीत पूर्ण झाली आणि या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेसोबतच पान मसाला आणि गुटख्यावरील जीएसटीवरही चर्चा झाली.

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या राज्यांना 5 वर्षांसाठी देय असलेली संपूर्ण जीएसटी भरपाई किंवा जीएसटी भरपाईची रक्कम जारी केली जात आहे. या अंतर्गत 16982 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांच्या जीएसटी भरपाईबाबतही माहिती देण्यात आली.

या वस्तूंवरील जीएसटी दर कमी केला

पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात येत असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. याशिवाय द्रव गुळावरील (काखी) जीएसटी दरही शून्यावर आणला जात आहे, जो पूर्वी 18 टक्के होता. परंतु हा द्रव गुळ सुट्टा विकणे आवश्यक आहे. जर हा द्रव गुळ पॅकबंद किंवा लेबल पद्धतीने विकला गेला तर त्यावर 5% जीएसटी आकारला जाईल. अशा प्रकारे द्रव गुळाच्या किरकोळ विक्रीवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे.

Ind VS Aus 2nd Test : अक्षर पटेलची एकाकी झुंज, 74 धावा करत सावरला भारताचा डाव 

दोन जीओएमचे अहवाल स्वीकारले गेले आहेत – अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, मंत्र्यांच्या दोन गटांचे अहवाल स्वीकारण्यात आले आहेत. त्यात आणखी किरकोळ बदल केले जाऊ शकतात.

Tags

follow us