Download App

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ‘SEBI’चं मोठं पाऊल; प्रवर्तकांबाबत घेतला ‘हा’ निर्णय

ईव्ही खरेदीच्या चौकशीत असे दिसून आले आहे की जेन्सोल इंजिनिअरिंगने ₹977.75 कोटींचे मुदत कर्ज घेतले होते. यापैकी 6,400

  • Written By: Last Updated:

Gensol Engineering Scam : मागील अनेक दिवसांपासून शेअर बाजारात एका शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. जेन्सोल इंजिनिअरिंगचा शेअर दररोज घसरत आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 86 टक्क्यांनी घसरला आहे. (Scam ) आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) या कंपनीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

सेबीची कारवाई

सेबीने त्यांच्या चौकशीत म्हटले आहे की दोन्ही प्रवर्तकांनी जेनसोल इंजिनिअरिंगमधील निधीचा गैरवापर केला आहे. याशिवाय शेअर बाजारात फेरफार करण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती देखील देण्यात आली आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी सेबी आता फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती करेल. हा अहवाल सहा महिन्यांत सादर करावा असं सांगण्यात आलं आहे.

प्रमोटर्सवर बंदी घातली

जेन्सोल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या प्रवर्तकांवर कडक कारवाई करत, सेबीने दोन्ही प्रवर्तकांना – अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांना कोणतेही संचालक किंवा महत्त्वाचे व्यवस्थापन पद भूषविण्यास बंदी घातली आहे. याशिवाय, त्यांना शेअर बाजारातील कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही. एवढेच नाही तर स्टॉक स्प्लिटवरही बंदी घालण्यात आली आहे.

मोठी बातमी! शेअर बाजारात फसवणूक, सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश

ईव्ही खरेदीच्या चौकशीत असे दिसून आले आहे की जेन्सोल इंजिनिअरिंगने ₹977.75 कोटींचे मुदत कर्ज घेतले होते. यापैकी 6,400 इलेक्ट्रिक वाहने (EVs) ₹663.89 कोटींना खरेदी करायची होती, परंतु केवळ 4,704 वाहने खरेदी करण्यात आली, ज्याची किंमत ₹567.73कोटी असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत, ₹ 262.13 कोटी रकमेबद्दल कोणतेही विशिष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

पैसे कुठे गेले?

उर्वरित रक्कम प्रवर्तकांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित संस्थांमध्ये वळवण्यात आली. यामध्ये रिअल इस्टेट खरेदी आणि कुटुंबातील सदस्यांना रोख रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, जेन्सोल आणि त्याचा ईव्ही पुरवठादार गो-ऑटो यांच्यात पैशांची राउंड-ट्रिपिंग आढळून आली असे आरो या कंपनीवर आहेत.

राउंड-ट्रिपिंग म्हणजे दोन कंपन्यांमध्ये तेच पैसे अशा प्रकारे वळवणे की जणू काही खरा करार झाला आहे. तसंच, जेनसोल इंजिनिअरिंगने 30,000 ईव्हीसाठी ऑर्डर मिळाल्याचा दावा केला होता, परंतु तपासात असे आढळून आले की तसे नव्हते. किंमत आणि डिलिव्हरी यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये समाविष्ट नव्हत्या. घटनास्थळी भेटीदरम्यान चौकशी केली असता, त्या कारखान्यात कोणतेही उत्पादन सुरू नसल्याचं आढळून आलं.

स्टॉक स्प्लिटवरील निर्बंध

जेन्सोल इंजिनिअरिंगने अलीकडेच 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा केली. सेबीने त्यावरही बंदी घातली आहे. गुंतवणूकदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बाजार नियामकाचे म्हणणे आहे. डिसेंबर 2024च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीकडे 35.34% किरकोळ गुंतवणूकदार होते. आज बीएसईवर जेन्सोल इंजिनिअरिंगचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून 122.68 रुपये प्रति शेअर झाले आहेत. या वर्षी आतापर्यंत हा शेअर 84 टक्क्यांनी घसरला आहे. आता गुंतवणूकदारांना हा स्टॉक विकून बाहेर पडायचे आहे, परंतु लोअर सर्किटमुळे ते त्यातून बाहेर पडू शकत नाहीत.

follow us

संबंधित बातम्या