Download App

Nagpur Teacher Scam : कठोर कारवाई करा… बोगस शिक्षक भरती प्रकरणी CM फडणवीसांचे आदेश

CM Devendra Fadanvis On Nagpur Teacher recruitment scam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्याकडून नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची दखल (Nagpur Teacher scam) घेण्यात आली आहे. फडणवीसांना याप्रकरणी कठोर कारवाई करा, असे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती मिळतेय. नागपूरमध्ये जवळपास 580 शिक्षकांची बोगस भरती झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या अपात्र शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आता रद्द होण्याची शक्यता आहे.

बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकारला कोट्यवधी रूपयांचा चुना लावण्यात आला होता. नागपूर विभागामधील या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सध्या (Nagpur Teacher recruitment scam) सुरु आहे. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये किती पगार जमा झाला, याची देखील तपासणी केली जाणार आहे.

ICC कडून सौरव गांगुलीला मानाचं पान; क्रिकेट समितीची धुरा दादाच्या हाती..

नागपूरमध्ये 580 बोगस शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याचा आरोप आहे. तर एका सेवानिवृत्त अधिकाराऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वाक्षरीचा बोगस नियुक्तीसाठी वापर केला, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. 2016 ते 2024 दरम्यान हा गैरप्रकार झालेला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामधील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ॲाडिओ क्लीप देखील व्हायरल झालीय. ही ऑडिओ क्लीप निलेश मेश्राम आणि बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रं तयार करणाऱ्या संबंधित व्यक्तीची असल्याची माहिती मिळतेय. निलेश मेश्रामच्या शाळा अन् संपत्ती आता पोलिसांच्या रडारवर आहे. निलेश मेश्राम शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक असून त्याच्या नातेवाईकांच्या नावावर शिक्षण संस्था आहेत. नागपूर पोलिसांनी त्याला रविवारी ताब्यात घेतलंय.

बांधकामासाठी नैसर्गिक वाळू बंद करण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली; 3 वर्षांचा आराखडाही ठरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोगस भरती प्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या 580 शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी अॅक्शन मोडमध्ये आहेत. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

follow us