Download App

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना 2.5 लाख कोटींचा फटका

  • Written By: Last Updated:

Indian stock market : यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) निर्णयानंतर, गुरुवारी, 21 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 570 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 19,750 च्या खाली घसरला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक घसरले. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सर्व क्षेत्रीय निर्देशांकही आज लाल रंगात बंद झाले. ऑटो, बँकिंग, वित्तीय सेवा आणि रियल्टी समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी, 30 शेअर्सचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 570.60 अंक किंवा 0.85 टक्क्यांनी घसरून 66,230.24 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 152.25 अंकांनी किंवा 0.77% ने घसरला आणि 19,749.15 च्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे 2.45 लाख कोटी रुपये बुडाले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 21 सप्टेंबर रोजी 318.06 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 20 सप्टेंबर रोजी 320.51 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.45 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.45 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण 

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे शेअर्स
सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 7 समभाग आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.47% वाढ झाली. यानंतर आज भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे समभाग वाढले आणि 0.59% ते 0.99% पर्यंत वाढले.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 शेअर्स
तर सेन्सेक्सचे उर्वरित 23 शेअर आज लाल रंगात बंद झाले. यापैकी आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 2.94 टक्क्यांनी घसरले. याशिवाय, हिंद्रा अँड महिंद्रा (M&M), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडसइंड बँक यांच्या शेअर्समध्ये 2.01 टक्क्यांवरून 2.88 टक्क्यांची घसरण दिसून आली.

2,327 समभाग घसरले

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज, शेअर्संची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,793 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,329 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,327 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 137 शेअर्स कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 177 शेअर्संनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. तर 29 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

Tags

follow us