शिवपूर : पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दिवशी सुरू झालेला गोंधळ थांबत नाही. शुक्रवारी (31 मार्च) पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. हावडा येथील शिवपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. यापूर्वी गुरुवारी हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यादरम्यान अनेक वाहने जाळण्यात आली.
एक दिवस आधी झालेल्या हिंसाचाराची परिस्थिती दाखवण्यासाठी एबीपीची टीम शिवपूरला पोहोचली असताना शुक्रवारी दगडफेक सुरू झाली. यादरम्यान शुक्रवारी दुपारी 1.15 मिनिटांनी दगडफेक सुरू झाली.
दंगलखोरांनी घटनेचे कव्हरेज करणार्या मीडिया कर्मचार्यांवरही दगडफेक केली, त्यामुळे मीडिया कर्मचार्यांना स्वतःला वाचवण्यासाठी लाईव्ह रिपोर्टिंगमध्ये धावा धाव करावी लागली.
मोठी बातमी : `रेडी रेकनर`चे दर जैसे थे! बांधकाम क्षेत्राला दिलासा
मेडियावाले रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतरची परिस्थिती कव्हर करत होते. दरम्यान, मागून जमावाने येऊन दगडफेक सुरू केली. जमावाचे लक्ष्य एका घरावर होते. यावेळी दुकानातील सामानाचीही तोडफोड करण्यात आली.
विशेष म्हणजे जेव्हा हिंसक जमाव हे सर्व करत होता तेव्हा पोलिस तेथे उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीत हा हिंसाचार घडत होता. अशा स्थितीत एक दिवसापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर ठोस व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न प्रशासनावर उपस्थित होत आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरू झाला.