Slogans Of Jai Shree Ram In Masjid How is Crime : ‘जय श्री राम’ची घोषणा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसं असू शकते, अशी महत्वपूर्ण टिप्पणी एका
याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण टिप्पणी केलीय. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने विचारलं की, धार्मिक वाक्याचा जप गुन्हा कसा ठरू शकतो? ‘जय श्री राम’चा (Jai Shree Ram) नारा लावणे हे गुन्हेगारी कृत्य कसे? याचिकेत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. ज्यामध्ये मशिदीच्या (Masjid) आत ‘जय श्री राम’चा नारा लावणाऱ्या दोन व्यक्तींवरील कारवाई रद्द केली होती.
तक्रारदार हैदर अली सी एम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने विचारलं की, (Supreme Court Of India) जर ते एखाद्या विशिष्ट धार्मिक वाक्प्रचार किंवा नावाने घोषणा असतील तर तो गुन्हा कसा? मशिदीच्या आत येऊन घोषणाबाजी करणाऱ्यांची ओळख कशी झाली, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदाराला विचारला.
‘तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय’; मनोज जरांगेंचं भुजबळांना थेट उत्तर
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यातर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांना विचारलं की, तुम्ही या प्रतिवादींना कसे ओळखता? ते सर्व सीसीटीव्हीत कैद झाल्याचं तुम्ही सांगत आहात. खंडपीठाने पुढे विचारले की, आत आलेल्या लोकांना कोणी ओळखले? खंडपीठाने म्हटलंय की, उच्च न्यायालयाला असे आढळून आलंय की, हे आरोप भारतीय दंड संहितेच्या कलम 503वा कलम 447च्या तरतुदींखाली लागू होत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, भारतीय दंड संहितेचे कलम 503 गुन्हेगारी धमकावण्याशी संबंधित आहे, तर कलम 447 गुन्हेगारी उल्लंघनासाठी शिक्षेशी संबंधित आहे. तक्रारीचा संदर्भ देत कामत म्हणाले की, एफआयआर हा गुन्ह्यांचा विश्वकोश नाही. जेव्हा खंडपीठाने विचारले की मशिदीत घुसलेल्या वास्तविक व्यक्तींची ओळख पटविण्यात तुम्ही सक्षम आहात का? त्यामुळे राज्य पोलिसांना याचा खुलासा करावा लागेल. त्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याला याचिकेची प्रत राज्याला देण्यास सांगितले. प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी 2025 पर्यंत तहकूब केली.
Syria : असद राजवटीनंतर विदेशी कनेक्शन समोर; बंडखोर अमेरिकेच्या संपर्कात
हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय की, जर कोणी ‘जय श्री राम’चा नारा लावला, तर त्यामुळे कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातील? या घटनेमुळे सार्वजनिक क्षोभ किंवा तेढ निर्माण झाल्याचा कोणताही आरोप नाही. आयपीसी कलम 506 अन्वये गुन्हेगारी धमकीचा गुन्हा केल्याचा आरोप असलेली व्यक्ती कोण आहे? हे
तक्रारदाराने पाहिलेलं नसल्याचं तक्रारीत म्हटलंय.
मशिदीत घुसून धार्मिक घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेल्या दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यांनी एफआयआर रद्द करण्याची आणि या प्रकरणी आपल्याविरुद्ध नोंदवलेली कारवाई करण्याची मागणी केली. 24 सप्टेंबर 2023 रोजी ही घटना घडल्याचा आरोप असून पुत्तूर सर्कलमधील कडबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
काही अज्ञात लोक मशिदीत घुसले आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा देत धमक्या देण्यास सुरुवात केली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. त्यावर, उच्च न्यायालयाने कथित गुन्ह्यांपैकी एकही घटक सापडत नसताना, या याचिकाकर्त्यांविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यास परवानगी देणे हा कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल. त्यामुळे न्यायाचा अपव्यय होईल, असं निरीक्षण नोंदवलं आहे. ही माहिती टीव्हीनाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.