Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. त्याने माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांची बरोबरी केली आहे. तर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) देखील मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु (INDvsENG) असणाऱ्या मालिकेत सध्या यशस्वी जयस्वाल जबरदस्त फॉमात असून पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावला होता.
यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2 हजार धावा करणारा संयुक्तपणे भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांची बरोबरी केली आहे तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 10 वा धावा काढताना जयस्वालने ही कामगिरी केली. या सामन्याच्या दुसऱ्या डावात तो 28 धावा करुन बाद झाला तर पहिल्या डावात त्याने शानदार 87 धावांची खेळी केली होती.
2⃣0⃣0⃣0⃣ Test runs & going strong 💪 💪
Joint-fastest for #TeamIndia to reach the milestone (by innings) along with Rahul Dravid and Virender Sehwag 🙌
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/sQ0wbRGmy1
— BCCI (@BCCI) July 4, 2025
जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 40 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागनेही 40 डावात 2000 धावा पूर्ण केल्या. जयस्वालने 21 कसोटी सामन्यांच्या 40 डावात 53.10 च्या सरासरीने 2018 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतके समाविष्ट आहेत. द्रविडने 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टनमध्ये आणि 2004 मध्ये चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीरेंद्र सेहवागने ही कामगिरी केली.
11 क्षेपणास्त्रे अन् 550 ड्रोन हल्ल्याने कीव हादरला, रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला
तर विजय हजारे आणि गौतम गंभीर यांनी 43 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या तर विराट कोहलीने 53 डावांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल सर्वात कमी वयात दोन हजार धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने 23 वर्षे 188 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. तर सचिन तेंडुलकरने 20 वर्षे 330 दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.