Download App

NEET-UG 2024 चं समुपदेशन होणारचं; SC ने याचिका फेटाळतं NTA ला पाठवली नोटीस

वैद्यकीय परीक्षेतील कथित अनियमिततेच्या सुरू असलेल्या वादात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG 2024 समुपदेशनाला स्थगिती देण्यास पुन्हा नकार दिला आहे.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  वैद्यकीय परीक्षेतील कथित अनियमिततेच्या सुरू असलेल्या वादात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG 2024 समुपदेशनाला स्थगिती देण्यास पुन्हा नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर, न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावली आहे. (Supreme Court declines to stay NEET counselling, issues notice to NTA)

2 आठवड्यांत उत्तर दाखल करा

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एका याचिकाकर्त्याने, 773 उमेदवार ग्रेस गुण न मिळाल्याने नापास झाले आहेत. संपूर्ण परीक्षा रद्द करावी. तसंच, 6 जुलैपासून सुरू होणारे समुपदेशनही 2 दिवसांसाठी वाढवावं अशी मागणी केली होती. मात्र, यावर सुप्रीम कोर्टाने समुपदेशनावर बंदी घालण्यास साफ नकार दिलाय. परंतु, फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेवर एनटीएला 2 आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

 

 

 

युक्तीवाद

याचिकाकर्ता – आम्ही NEET परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी करत आहोत. 773 उमेदवार सवलतीच्या गुणांशिवाय नापास झाले आहेत.

न्यायमूर्ती नाथ एनटीए कौन्सिलने उत्तर दाखल करावं. 2 आठवड्यांच्या आत उत्तर द्या. बाकीच्या केसेससह टॅग करा.

याचिकाकर्ता – आम्हाला समुपदेशनावर बंदी नको आहे. फक्त 2 दिवस वाढवायचे आहेत. 6 जुलैपासून समुपदेशन सुरू होत आहे. यासंबंधीची प्रकरणे 8 जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहेत.

न्यायमूर्ती भट्टी – समुपदेशन खुलं आणि बंद नाही. ही एक प्रक्रिया आहे. 6 जुलैपासून केवळ प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांना आठवडाभरानंतरही फेरबदलाचा पर्याय असेल.

तपासाची मागणी फेटाळण्यात आली होती

20 जून रोजी सुप्रीम कोर्टात NEET प्रकरणावरील सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठाने NEET समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला होता. या प्रकरणातील सीबीआय तपासाची मागणी खंडपीठाने फेटाळून लावली आणि सर्व पक्षांचे म्हणणं ऐकल्याशिवाय आम्ही सीबीआय तपासाचे आदेश देऊ शकत नाही, असं सांगितलं होतं.

follow us

वेब स्टोरीज