न्यायप्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न, विजय सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले ! ‘दीपाथून’ पुन्हा प्रज्वलित करण्याचे आदेश

Supreme Court: न्यायप्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न कोणत्याही व्यक्तीने केला, मग त्याचे पद कितीही मोठे असले तरी तो सहन केला जाणार नाही.

Cm Vijay

Cm Vijay

नवी दिल्ली : तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुप्परनकुंद्रम टेकडीवरील कार्तिगई दीपम वादावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शुक्रवारी कठोर भूमिका घेतलीय. न्यायालयाने विजय सरकारला ( Chief Minister Vijay (TVK) ) फटकारत टेकडीवरील दीपाथून (Deepathun) (दीप प्रज्वलित करण्याचा स्तंभ) शनिवारी (२८ नोव्हेंबर) रोजी संध्याकाळी धार्मिक दीप प्रज्वलित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास घटनात्मक अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशाराही खंडपीठाने दिला.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठासमोर अवमान याचिकेवर सुनावणी झाली. न्यायप्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न कोणत्याही व्यक्तीने केला, मग त्याचे पद कितीही मोठे असले तरी तो सहन केला जाणार नाही. न्यायालयाचे आदेश हे केवळ चर्चेसाठी नसून राज्य सरकार, अधिकारी आणि सर्व संस्थांवर बंधनकारक आहेत, असेही न्यायालयाने सुनावले आहे.


शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’! सेन्सेक्स 989 अंकांनी कोसळला, निफ्टी 25,600 वर; गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान

मंदिराच्या विश्वस्त मंडळ निलंबित; प्रशासन समितीकडे
सुप्रीम कोर्टाने सुब्रमण्य स्वामी मंदिराच्या विश्वस्त मंडळाला निलंबित केले आहे. तसेच दोन न्यायाधीशांच्या समितीमार्फत मंदिराचे प्रशासन आपल्या नियंत्रणाखाली घेतले आहे. २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्याने न्यायालयाने ही कठोर कारवाई केली. यापूर्वी न्यायालयाने तिरुप्परनकुंद्रम टेकडीवरील दीपाथून स्तंभावर दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही 24 नोव्हेंबर रोजी दीप प्रज्वलित करण्यात आला नाही. मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मद्रास हायकोर्टात आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आदेशाचे पालन न झाल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आले.


इंडिया आघाडीत डिलिमिटेशनवरून मोठा भूकंप! लालूंच्या RJD चा धक्कादायक निर्णय, काय घडलं?


‘आमच्या आदेशाचे पालन झाले नाही तर आम्ही शांत बसणार नाही’

राज्य सरकारला फटकारताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, अशा घटनांवर कठोरपणे कारवाई करण्याची वेळ आली आहे. अन्यथा देशात घटनात्मक अराजकता निर्माण होऊ शकते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसेल तर न्यायालय शांत बसू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. न्यायप्रक्रिया दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. व्यक्ती कितीही उच्च पदावर असली तरी न्यायालयाच्या आदेशापुढे सर्वांना जबाबदार राहावे लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.


उद्या दीप प्रज्वलित करण्याचे आदेश; भाविकांना परवानगी

सुप्रीम कोर्टाने 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दीपाथून येथे धार्मिक दीप प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमात सर्व भाविकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. टेकडीवरील सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (CRPF) सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दीप प्रज्वलित करण्याचे ठिकाण दरगाहपासून किमान 50 मीटर अंतरावर असावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर दरगाह आणि परिसराच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

तमिळनाडू सरकार घटनात्मक अराजकतेच्या स्थितीत : सुप्रीम कोर्ट
तमिळनाडू सरकार घटनात्मक अराजकतेच्या स्थितीत असल्याची कठोर टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरुवातीच्या भूमिकेवर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यापक अधिकार असतानाही त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनावर ढकलल्याचे न्यायालयाने नमूद केले.

नेमकं प्रकरण काय आहे?

मदुराई येथील तिरुप्परनकुंद्रम टेकडीवरील दीपथून या दगडी स्तंभावर कार्तिगई दीपम हा पारंपरिक दिवा लावण्यावरून वाद सुरू आहे. या टेकडीवर सुब्रमण्य स्वामी मंदिर आणि सिकंदर दर्गा जवळजवळ आहेत. त्यामुळे दीपथूनवर दिवा लावण्याच्या मुद्द्यावरून धार्मिक आणि प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे.

Exit mobile version