Download App

सर्वोच्च न्यायालयाकडून अदानींना मोठा दिलासा, हिंडनबर्ग प्रकरण SIT कडे सोपवण्यास स्पष्ट नकार

  • Written By: Last Updated:

Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात (Adani Hindenburg case) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णण देत अदानी समुहाला आणि गौतम अदानींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत सेबीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणावरील 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, या प्रकरणात SIT चौकशीचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने तब्बल चार याचिकांवर हा निकाल दिला.

 

यापूर्वी, SC ने सेबीचा तपास अहवाल आणि तज्ज्ञ समितीच्या निःपक्षपातीपणावर शंका नसल्याचे म्हटले होते. तसेच हिंडेनबर्ग अहवाल हे अंतिम सत्य नसल्याचेही निरीक्षणही न्यायालयाने नोंदवत या प्रकरणावरी निकाल राखून ठेवला होता. तसेच अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या सेबीची बदनामी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर आज (दि.3) सर्वोच्च न्यायालयाने वरील निकाल दिला आहे.

‘महानंदा’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प बसणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा

हिंडेनबर्गचा अहवाल कधी आला?

24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांचा अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, हे सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळत अहवाल खोटा असल्याचे म्हटले होते. हा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने कंपनीला आर्थिक फटका बसला होता.

Ashok Chavan : ‘भाजपाच्या संपर्कात कोण, नावं द्या’; चव्हाणांचं थेट विखेंना आव्हान

न्यायालयाच्या निकालानंतर शेअर्सवर दिसणार परिणाम 

गेल्या वर्षी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यानंतर आता या प्रकरणावर न्यायालयाने निकाल  दिला आहे. त्यामुळे या निकालाच थेट परिणाम आज शेअर मार्केटवर दिसून येऊ शकतो.

follow us