Download App

श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वाद; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Sri Krushna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद (Sri Krushna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid) वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने शाही इदगाह मशीद समितीने दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 14 डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

Devendra Fadnavis : ‘मी मुर्खांना उत्तरं देत नाही’; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीसांचा संताप

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात वकील आयुक्त नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांना मशीद परिसराचे सर्वेक्षण करायचे होते. मशीद समितीच्यावतीने अधिवक्ता तसनीम अहमदी सर्वोच्च न्यायालयात हजर झाल्या. त्यानंतर वकिलाच्या युक्तिवादात मथुरा खटला 1991 च्या प्रार्थनास्थळांनुसार फेटाळण्याची याचिका अद्याप प्रलंबित असल्याचं म्हटलं.

या परिस्थितीत उच्च न्यायालय सर्वेक्षणाचे आदेश देऊ शकत नाही. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीस बजावली असून उत्तरही मागवले आहे. मात्र, या प्रकरणावरील सुनावणी उच्च न्यायालयात सुरूच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Bahirji Movie Teaser: ‘हिंदवी स्वराज्याचा पहिला गुप्तहेर; ‘बहिर्जी’ चा धमाकेदार टिझर रिलीज

शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त नेमण्याची मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर 14 डिसेंबर रोजी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशीद परिसराच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त नेमण्याचे आदेश दिले होते.

अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केली ‘सेव्हन स्टार’ प्रॉपर्टी

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, याचिकेत दावा करण्यात आला होता त्या मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचे जन्मस्थान आहे. मशीद हिंदू मंदिर असल्याचे सिद्ध करणारे अनेक चिन्हे आहेत. तसेच तेथे कमळाच्या आकाराचा स्तंभ आहे, जो हिंदू मंदिराचे वैशिष्ट्य आहे. शेषनागाची प्रतिमाही आहे.

मशिदीच्या खांबांवर हिंदू धार्मिक चिन्हे आणि कोरीवकाम आहेत. याचिकेत न्यायालयाच्या आयुक्तांनी संपूर्ण सर्वेक्षणाचे छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करण्याची मागणीही केली होती. या याचिकेला मशीद समितीने विरोध केला होता, मात्र उच्च न्यायालयाने या विरोधाकडे दुर्लक्ष करून न्यायालयीन आयुक्त नेमण्याचे आदेश दिले होते.

follow us