‘दरोड्याची पोलखोल करणार’; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी राऊतांचा नार्वेकर-शिंदेंवर हल्लाबोल

‘दरोड्याची पोलखोल करणार’; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी राऊतांचा नार्वेकर-शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut : राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका होत आहे. आजच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात खुली पत्रकार परिषद घेणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान मोदींनी सुद्धा एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. आज मात्र आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. मोदींनीही खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

Devendra Fadnavis : ‘मी मुर्खांना उत्तरं देत नाही’ राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीसांचा संताप

राऊत पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. त्यांच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार, खासदार. अशा प्रकारे पैशांच्या जोरावर पळवून न्यायचे आणि चोरबाजी करायची. हे तुम्हालाच लखलाभ. आम्ही मात्र लढा देत राहू. आज याच विषयावर दरोडे कसे टाकण्यात आले यावर महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे असे स्पष्ट करत अशा प्रकारची खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंनी दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.

दावोस दौरा म्हणजे सरकारी तिजोरीची लूट 

उद्योगमंत्री मोठमोठ्या गोष्टी करत आहेत. 55 जणांचा ताफा सरकारी पैशाने गेला आहे. कुणाची गरज आहे? कुणाची गरज नाही? एक पिकनिक सहल काढलेली आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू आहे. मुंबईतील जो रोजगार गुजरातला गेला आहे, तो पहिला आणा मग दाओस वरून आणा. आम्ही तुमचा खर्च करू, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली.

संजय राऊतांचे तीन इंद्रिये निकामी, त्यामुळं बेताल वक्तव्य; मिटकरींची जहरी टीका

दिल्लीच्या आदेशाने मिलिंद देवरांचा पक्षप्रवेश

काही उद्योगपती आणि दिल्लीतले भाजपचे लोक ते मुंबईचं राजकारण आपल्या ताब्यात घेऊ इच्छित आहेत. त्यासाठी त्यांना काही लोक हाताशी पाहिजे आहेत, मला वाटतं त्यांचं हे पाऊल आहे. एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं की मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करून घ्या आणि त्यांना राज्यसभेवर पाठवा. जे जुने काही लोक आमचा पक्ष म्हणून गेले आहेत त्यांचं काय होणार? जर बाहेरून आलेल्या लोकांना तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्याने दबाव आणला जातोय, अशा पदांवर जाणार असतील त्या गटाचं भविष्य काही खरं नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज