Download App

Supreme Court उद्या सत्तासंघर्षाची सुनावणी, ठाकरे गटाची विनंती मान्य होणार का?

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लटकले आहे. उद्या (14 फेब्रुवारी) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) विनंती कोर्ट मान्य करणार का? याचं उत्तर उद्या मिळणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती.

हे प्रकरण आता सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार का? याचा निर्णय उद्या होणार आहे. साहजिकच या एका गोष्टीवर केसच्या निकालाचं वेळापत्रकही अवलंबून असणार आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं तर आणखी वेळ लागेल. जर सध्याच्या घटनापीठाकडे राहिलं तर मग सलग सुनावणी तातडीने सुरु होणार का याची उत्सुकता असणार आहे.

या अगोदर दोन न्यायमूर्तींचं व्हेकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर सात न्यायमूर्तींचं बेंच असेल.

LTTE leader Prabhakaran जिवंत! जागतिक तमिळ परिषदेच्या पी नेदुमारन यांचा दावा

सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं 20 जून 2022 च्या दरम्यान. त्यानंतर आता 2023 आले म्हणजे आठ महिने झाले तरी या केसमध्ये अद्याप एकही निर्णय, आदेश झालेला नाही. केवळ बेंच बदलत आले. त्यामुळे आता उद्या काय होणार याची उत्सुकता आहे. मुळात हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्या अशी मागणी ठाकरे गटानेच केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत उद्या पहिल्याच क्रमांकावर हे प्रकरण आहे. या घटनापीठाकडे सध्या तीन विषय होते. त्यातल्या दिल्ली आणि केंद्र सरकारच्या अधिकारातल्या संघर्ष प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. तर एनआरसीचं प्रकरण नंतर ठेवलं आहे.

त्यामुळे सध्या या घटनापीठाची प्राथमिकता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण दिसत आहे. त्यामुळे बघावं लागेल की उद्या काय होतं आणि किती सलग सुनावणी आता कोर्ट करत आहे.

Tags

follow us