Download App

केरळमध्ये हायअलर्ट, शाळा बंद; देशाची काळजी वाढवणारा ‘निपाह’ किती धोकादायक?

Nipah Virus Symptoms : कोरोना व्हायरसला तोंड दिल्यानंतर आता एका नव्या व्हायरसनं तोंड वर काढलं आहे. केरळ राज्यात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळ सरकार अलर्ट झालं आहे. त्यामुळे आता या आजाराची लक्षणं काय आहेत? हा आजार नेमका पसरतो कसा? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना पत्र लिहित शिंदे-फडणवीसांची तक्रार

निपाह विषाणूच्या संसर्गामुळे केरळमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने केंद्र सरकारकडून खबरदारी म्हणून कोझिकोडे येथे आरोग्य पथक पाठवलं आहे. निपाह विषाणूच्या संसर्गाचा वेग कोरोनाच्या तुलनेत कमी आहे. असं असलं तरी हा विषाणू कोरोनापेक्षा घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 40 ते 75 टक्के आहे.

Maratha Reservation : मुख्यमंत्री मनोज जरांगेंना भेटणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं…

निपाह विषाणूची लक्षणं काय आहेत?
निपाह हा एक झुनोटिक आजार आहे. या विषाणूचा संसर्ग माणसाला प्राणी किंवा अन्नाच्या माध्यमातून होतो. संसर्गजन्य व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास या आजाराचा संसर्ग होतो. या व्हायरसमुळे ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, खोकला, श्वास घेण्यासाठी अडचण येणे, उलट्या अशा प्रकारची लक्षणं दिसून येऊ शकतात. त्यासोबतच झोप येणे, गरगरणे, मेंदूला सूज येणे अशा प्रकारची लक्षणं देखील दिसू शकतात. मेंदूला सूज आल्यानंतर रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. त्यातच त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

निपाह विषाणू आला कुठून?
निपाह विषाणूच्या संसर्गाचा पहिला रुग्ण मलेशियात 1998 मध्ये आणि सिंगापूर येथे 1999 येथे आढळले. मलेशियामधील निपाह गावात या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला, त्यावरुनच या व्हायरसला निपाह असं नाव देण्यात आलं. या विषाणूचा प्राण्यांपासून माणसापर्यंतचा प्रसार हा संसर्गजन्य अन्न खाल्यामुळे झाला. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या म्हणण्यानुसार संसर्ग झालेल्या वटवाघळाची लाळ किंवा त्याच्या लघवीने संक्रमित झालेले खजूर खाल्ल्याने देखील या विषाणूचा मानवामध्ये प्रसार होऊ शकतो. वटवाघळ राहात असलेल्या झाडावर चढल्यामुळे देखील निपाहचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. वटवाघळाच्या माध्यमातून डुक्कर, कुत्रा, शेळी, मेंढी, घोडा अशा प्राण्यांना विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

एका माणसापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होण्याचीही दाट शक्यता असते. त्याचसोबत संक्रमित अन्न खाल्ल्याने निपाहचा संसर्ग होऊ शकतो. बांगलादेश आणि भारतामध्ये देखील एका माणसाच्या संपर्कात दुसरा माणूस आल्याने त्यालाही संसर्ग झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

निपाहचा 1998-1999 पासून अनेकवेळा उद्रेक झालेला पाहायला मिळाला आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण बऱ्याचदा आढळले आहेत. बांगलादेशमध्ये 2001 पासून आत्तापर्यंत 10 वेळा निपाहचा उद्रेक झालेला आहे. भारतामधील पश्चिम बंगालमध्ये 2001 आणि 2007 मध्ये निपाहचे रुग्ण आढळले.

निपाह संसर्गाचं प्रमाण किती?
कोरोनाच्या तुलनेत निपाह विषाणूच्या संसर्गाचा वेग कमी आहे. असं असलं तरी निपाहच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कोरोनाच्या तुलनेत जास्त आहे. 2001 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निपाहचा उद्रेक झाला, त्यावेळी 66 पैकी 45 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 2007 मध्ये पश्चिम बंगालमध्येच पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर 2018 साली केरळमध्ये 18 पैकी 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

निपाहचा संसर्गदर कमी असल्याने त्यावर लवकर नियंत्रण मिळवता येते. त्याचबरोबर एका माणसापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असल्याने या विषाणू संसर्गावर लवकर नियंत्रण मिळवणं शक्य होतं, असंही सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us