Download App

Maratha Reservation : मुख्यमंत्री मनोज जरांगेंना भेटणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं…

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा सुरु असून शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलस्थळी यावं. अशी अट घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार की नाही? याबद्दल चर्चेला उधाण आलं होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानंतर ते मनोज जरांगेंची भेट घेणार की नाही? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

टेंडरमध्ये भ्रष्टाचार; सत्ताधारी आमदाराने केली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यानूसार निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीचा अहवाल काहीही येवो, आरक्षण द्यावेच लागेल. राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतील, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निलंबित करा, तसेच उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे आले पाहिजेत, अशा प्रमुख अटी जरांगे पाटलांनी राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत.

Agriculture News : शेतकऱ्यांची चिंता वाढली; खते महागणार, रशियाकडून खतांवरील सवलत बंद

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र याकाळात आंदोलन सुरुच राहणार आहे. पाच प्रमुख मागण्या करत एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा एकाही मंत्र्याला राज्याच्या सीमेवर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या घडामोडींतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्याबरोबर चर्चा केली.

अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरु असून कालही राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी गेलं मात्र, ही भेट निष्फळ ठरली, आजही राज्य सरकारचं शिष्टमंडळ जाणार असून शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची नेमकी काय चर्चा होते? त्यावर पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

कायदेशीरदृष्ट्या आरक्षण बसत असेल तरच द्या, अन्यथा खेळ करू नका, संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांकडून उपोषण, आंदोलन करण्यात येत आहे, काही ठिकाणी तर आंदोलकांनी विष प्राशन केल्याच्याही घटना घडल्यां दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर अटी ठेवल्यानंतर अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांची भेट घेणार की नाही? हे स्पष्ट झालेलं नाही.

पुढील काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकार मान्य करणार की नाही? मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सोडण्यासाठी सरकार त्यांच्या अटी मान्य करणार का? तसेच मनोज जरांगेंच्या अटीनूसार मुख्यमंत्री त्यांची भेट घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us