अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना पत्र लिहित शिंदे-फडणवीसांची तक्रार
Anna Bansode Letter : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या भोजन आणि दुध पुरवठ्याच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार बनसोडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. वारंवार तक्रार करुन ही दखल घेत नसल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. (MLA Anna Bansode complained directly to Prime Minister Narendra Modi against Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis)
दरम्यान, बनसोडे यांच्या या पत्रामुळे महायुतीत मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार बनसोडे यांनी पंतप्रधन मोदींना लिहिलेल्या पत्रात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निधीत टेंडरच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आणि या टेंडर घोटाळ्याकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याची आरोप केला आहे. तसंच पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घालून भोजन आणि दुध पुरवठ्याचे टेंडर रद्द करावे अन्याथा आमदार बनसोडे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
अण्णा बनसोडे यांनी पत्रात काय म्हटले?
सामाजिक न्याय विभागाने 450 वस्तीगृह व 100 शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्यासाठी 26/7/2022 रोजी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानिविदेच्या अटी व शर्थी या एका ठेकेदार कंपनीसाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी चंद्रकांत गायकवाड नामक एका एजंटच्या मध्यस्थीने तयार केलेल्या असून पूर्वी जिल्हा स्तरावर निवेदन मागून हे काम करण्यात येत होते. मोठी निविदा काढून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
ही बाब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, सामाजिक न्याय विशेष व सहाय्य सचिव, आयुक्त यांना पत्राद्वारे व समक्ष भेटून निदर्शनास आणून दिलेले आहे. परंतु आजपर्यंत सार्वजनिक हिताच्या व मागासवर्गीय समाजाच्या योजनेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई झालेली नाही, म्हणून या पत्राद्वारे ही बाब आपल्याला दर्शनास आणून देत आहे, असे त्यांनी पुढे म्हंटले आहे.
Maharashtra : 6 महिन्यांत 10 शहरांत धार्मिक तणाव; सोशल मीडिया की समाजविघातक प्रवृत्ती जबाबदार?
सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व एजंट मागासवर्गीय निधीची लूट गेली दहा वर्षापासून करत असून या प्रकरणाची ईडी/सीबीआय यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी. तरी, सामाजिक न्याय विभागाने वस्तीगृह शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भोजन व दूध पुरवठा करण्यासाठी काढलेले निविदा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी अण्णा बनसोडे यांनी केली आहे.
Maratha Reservation : ‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; पल्लवी जरांगे कडाडल्या…
आपण या प्रकरणाची गांभीर्य ओळखून सदर प्रकार तात्काळ थांबवण्यासाठी आवश्यक योग्य कारवाई करावी. मी गेल्या वर्षभरापासून या विषयावर आवाज उठवत आहे. मात्र याचे अद्याप दखल घेतली नाही तरी आपण या प्रकारची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा मला मागासवर्गीयाच्या हिताचा प्रश्न म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा आमदार बनसोडे यांनी दिला आहे.