‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; जरांगेंची लेक कडाडली

‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; जरांगेंची लेक कडाडली

Maratha Reservation : मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही, वाघाची जात आहे वाघासारखेच फाडून टाकू, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मागील 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीत जरांगेंच आमरण उपोषण सुरु आहे, या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने त्यावर भाष्य करीत पल्लवी जरांगेंनी सरकारला इशाराच दिला आहे.

Asian Games 2023: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी, उमरान मलिक घेणार जागा

जरांगे म्हणाल्या, तुम्हाला आमचं आंदोलन लाठीचार्ज करुन चिरडायचं का? पण ते जमणार नाही मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही, वाघाची जात आहे वाघासारखीच फाडून टाकू, असं पल्लवी जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

सत्तेतील सहभागासाठी रोहित पवारांचंच पहिलं समर्थन; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट !

तसेच मागील अनेक वर्षांपासून राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे, तर मग मराठा समाजाने काय पाप आणि गुन्हा केला आहे? गेल्या 16 दिवसांपासून माझा बाप आंतरवली सराटीत उपोषणाला बसला आहे. माझा बाप मराठा समाजाच्या लेकरांसाठी अन् आरक्षणासाठी बसला असल्याचं पल्लीव जरांगे म्हणाल्या आहेत.

IND vs SL : रोहित शर्मा 10 हजारी मनसबदार, सचिनला मागे टाकत बनला विक्रमवीर

आम्ही मराठ्यांमध्ये जन्म घेतला आहे त्याचा आम्हाला अभिमान असून मराठा कुणबी हायं, मराठ्यांमध्ये जन्म घेतला म्हणून आम्ही कोणता गुन्हा आणि काय पाप केलं आहे. माझा बाप फक्त चार लेकरांचा बाप नाहीतर चार दिवस तो सगळ्या समाजाचा बाप आहे, याचं लेकरांसाठी आज तो आमरण उपोषणाला बसला, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी पल्लवी जरांगे यांनी केली आहे.

G20 Summit : ‘हा मोदी सरकारवर काळाने घेतलेला सूड’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मराठा समाज गरीब कुणबी आहे, शेती करुन आपला उदरनिर्वाह करतो, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागत आहोत, दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या आम्ही विरोधात नसून आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, अशी मागणी पल्लवी जरांगे यांनी केली आहे.

दरम्यान, सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखल देण्यात यावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यभरातून मराठा समाज पेटून उठल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतरही मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण अद्यापही सुरुच असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube