कायदेशीरदृष्ट्या आरक्षण बसत असेल तरच द्या, अन्यथा खेळ करू नका, संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
Maratha reservation : 2014 ला राणे समितीने आरक्षण दिले होते. ते टिकले नाही. त्यानंतर 2016 महामोर्चे सुरु झाले म्हणून 2018 ला आरक्षण देण्यात आले पण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. 2021 ला न्यायालयाने आरक्षण रद्द केलं. त्यावेळीपासून मी पत्र लिहित आहे. पहिलं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही पाठवलं. तेव्हापासून सांगतोय की मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करायला पाहीजे, सर्वेक्षण पुन्हा एकदा करा आणि सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही,असे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
सरकारने याची काळजी घ्यावी. सरकारला मी सांगत होतो त्यांनी काही केलं नाही. ही सर्वपक्षीय बैठक आधी का घेतली नाही. सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देणं कायदेशीरदृष्ट्या बसत असेल तर सरकारने ते द्यावे. पण हे शक्य नसेल तर सरकारने तसं स्पष्ट सांगावं. खेळ करू नये, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
Supriya Sule : अजितदादांचा व्हिडिओ पाहताच सुळेंना अश्रूचा बांध फुटला…
सर्वपक्षीय बैठकीला मला आमंत्रित बोलवलं होतं. माझा मुद्दा मांडून मी निघालो आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं होतं. 15-20 वर्षापासून मी गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मागणी करत आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील तीन-चार वर्षापासून उपोषणाला बसत आहेत. सरकार दरवेळी आश्वासन देतं पुढे काही होत नाही. यावेळी देखील जरांगे पाटील उपोषणाला बसतात पण लाठीचार्ज झाल्याने वातावरण बदललं. लाठीचार्जआधी ही चर्चा व्हायला हवी होती,असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग
मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होती. त्यानंतर आपल्या मागणीत सुधारणा करत महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून अनेक तज्ञ मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहिती नाही. मी सरकारला स्पष्ट सांगितले की न्यायिक पद्धतीने जर सरसकट बसत असेल तर सरकारने द्यायला पाहिजे. पण केवळ मराठा समाजाला खूष करण्यासाठी जीआर काढणार असाल आणि कायदेशीर टिकणार नसेल तर चालणार नाही. कारण यापूर्वी 49 मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांशी खेळ होता कामा नये, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.