Supriya Sule : अजितदादांचा व्हिडिओ पाहताच सुळेंना अश्रूचा बांध फुटला…

Supriya Sule : अजितदादांचा व्हिडिओ पाहताच सुळेंना अश्रूचा बांध फुटला…

Supriya Sule : झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात अनेक राजकारणी आपली हजेरी लावत असतात, अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Suriya Sule) यांनीही हजेरी लावली असून त्यांच्या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार(Ajit Pawar)-सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या कुटुंबासमवेतच्या फोटोंनी संग्रहित केलेला व्हिडिओ दाखवताच सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांना मिळालं निमंत्रण; बैठकीत आरक्षणावर तोडगा निघणार?

झी मराठीच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ शोचा नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये मंचावर सुप्रिया सुळेंची(Supriya Sule) एन्ट्री झाल्यानंतर बॅकग्राऊंडला ‘एकवेळ कुटुंबाताल माणसं साथ सोडतील, पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत, अशी गाण्यांची ओळ मागे ऐकायला येते आणि सुप्रिया सुळेंना अजितदादांचा फोटो दाखवण्यात येतो.

नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांना तात्काळ निलंबित करा; कॉंग्रेसची मागणी

अजितदादांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर होतात. एकूणच ही परिस्थिती पाहिल्यानंतर कार्यक्रमाचे निवदेक अवधुत गुप्ते म्हणतात, “तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला म्हणाला होता, की मी कोणासमोर भावना उघड करु शकत नाही. पण आता…!” एकंदरीत पाहता अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे व्यक्त झालेल्या दिसल्या आहेत.

Maratha Reservation : ‘ओबीसी’मधून नको, आरक्षणाची मर्यादाच वाढवा; शरद पवारांनी सुचवला तोडगा

व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना अजित पवारांसोबतचे राजकारणातील आणि कुटुंबातील अनेक क्षणांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. यावेळी त्यांची अजित पवारांना ओवाळतानाची व्हिडिओ देखील लागतो. ही दृश्य पाहताच सुप्रिया सुळेंचा अश्रूंचा बांध फुटल्यानंतर पदर हातात धरुन सुप्रिया सुळे रडायला लागत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. यावेळी ‘फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना हैं’ हे गाणं प्रोमोमध्ये बॅकग्राऊण्डला लावण्यात आले आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या समर्थकांनी सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादीत उभी पाडल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर सुरुवातील राजकीय वर्तुळात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. अजित पवार ह आमचे नेते असल्याचा दावाही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र, आता शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांवर अपात्रतेची कारवाई सुरु करण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube