मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांना मिळालं निमंत्रण; बैठकीत आरक्षणावर तोडगा निघणार?

  • Written By: Published:
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांना मिळालं निमंत्रण; बैठकीत आरक्षणावर तोडगा निघणार?

Maratha Reservation : गेल्या १४ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे उपोषण करत आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन, बंद केले जात आहे. त्यामुळं सरकारनं नमतं घेत कुणबी नोदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर काढला. मात्र, जरांगे पाटील हे सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी पाणी आणि उपसार घेण्यास नकार दिला. त्यामुळं सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

१. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री,
२. उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री
३. ग्रामीण विकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री
४. उद्योगमंत्री
५. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम).
६. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री
७. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते
८. अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
९. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
१०. उदयनराजे भोसले, राज्यसभा सदस्य
११. नाना पटोले, आमदार, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
१२. बाळासाहेब थोरात, आमदार, काँग्रेस
१३. जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी
१४. राजेश टोपे, आमदार, राष्ट्रवादी
१५. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, प्रदेशाध्यक्ष, भाजप
१६. जयंत पाटील, आमदार, शेतकरी कामगार पक्ष
१७. हितेंद्र ठाकूर, आमदार, बहुजन विकास आघाडी
१८. कपिल पाटील, आमदार, लोकभारती पक्ष
१८. विनय कोरे, आमदार, जनसुराज पक्ष
२०. महादेव जानकर, आमदार, राष्ट्रीय समाज पक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक, विधिवत पूजा 

२१. बच्चू कडू, आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष
२२. राजू पाटील, आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
२३. रवी राणा, आमदार
२४. विनोद निकोले, आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
२५. संभाजीराजे भोसले, माजी राज्यसभा सदस्य
२६. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी
२७. सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
२८. जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी
२९. राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
३०. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
३१. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), महसूल आणि वन विभाग
३२. प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग

माझा उपचाराच मराठा आरक्षण
दरम्यान, सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीबाबत मी यापूर्वीही बोललो आहे, मराठा समाजाने सर्व पक्षांना समृद्ध केले आहे, आता मराठ्यांना देण्याची जबाबदारी त्यांची आहे. सगळा महाराष्टर् पाहतोय की कोणता पक्ष आम्हाला साथ देतोय. कोणता पक्ष किती भक्कम ताकदीने उभं राहतो. कोण कोणावर अन्याय करतो हे आज आमच्या लक्षात येईल,असं जरांगे पाटील म्हणाले.

माझा उपचाराच मराठा आरक्षण आहे, आज जी सर्व बैठक आहे, त्यात माझ्या वेदनांवर सर्वांना उपचार करावे. माझ्या वेदना, समजाच्या वेदना आहे. माझे उपचार म्हणजे, मराठा आरक्षण आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube