Maratha Reservation : ‘ओबीसी’मधून नको, आरक्षणाची मर्यादाच वाढवा; शरद पवारांनी सुचवला तोडगा

  • Written By: Published:
Maratha Reservation : ‘ओबीसी’मधून नको, आरक्षणाची मर्यादाच वाढवा; शरद पवारांनी सुचवला तोडगा

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतलं आणि कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी समाज आक्रमक झाला. मराठ्यांना आमचं आरक्षण देऊ ऩका, अशी मागणी होऊ लागली. दरम्यान, या सर्व बाबींवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मार्ग सुचवला.

आज वाय बी सेंटर येथील पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीवर कायमस्वरुपी तोडगा अद्याप काढला नाही. जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळं यातून काही तरी मार्ग काढणं गरजेचं आहे. मार्ग काढायचा असेल तर आज पन्नास टक्याचं जे बंधन आहे, ते पूर्ण द्यायची आवश्यकता आहे. आणि त्यात आणखी 16 टक्के आरक्षण वाढवलं पाहिजे. वाढवलेलं 16 टक्के अधिक मूळ पन्नास टक्के यामध्ये सर्व प्रश्न सुटतात.

G20 Summit: कोण आहेत ‘भारत मंडपम’चे शिल्पकार संजय सिंह? 

शरद पवार म्हणाले, ओबीसींच्या अथवा कोणत्यचाही कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, त्यातून वाद वाढतली. त्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा 50 टक्यांपेक्षा 16 टक्यांना वाढवण्याची तरुदत केंद्र सरकारने करावी. तमिळनाडू सरकारने हे आरक्षणाचं बंधन 74 टक्यांवर नेलं आणि ते सुप्रिम कोर्टात हे आरक्षण टिकलं देखील. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टाने निकाल दिला, तर केंद्र सरकारने संसदेत दुरुस्ती करून तरदुत केली तर हा प्रश्न सुटू शकतो, असं पवार म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, ही मागणी त्यांनी लावून धरली. या मागणी संदर्भात अभ्यास करण्यसाठी सरकारने वेळ मागितला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube