नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग

  • Written By: Published:
नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग

अहमदनगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात येणार आहे. स्मायलिंग अस्मिता व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या
बुधवारी दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मार्गाचा नामकरण सोहळा पार पडणार आहे.

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्याकडे निवेदनातून ही मागणी करण्यात आली होती. आरक्षणाचे जनक शाहू महाराजांच्या वडिलांचा इतिहास पुढे आणण्यासाठी छत्रपती दिल्लीगेट ते पत्रकार चौक या शहरातील मुख्य रस्त्याला छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

गणेश कवडे यांनी सदरील प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजूर करून घेतला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या छत्रपतींच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठीची ऐतिहासिक संधी मला मिळाली याचा अभिमान आहे. गणेश कवडे यांनी दिल्लीगेट ते पत्रकार रस्त्याची पाहणी करून सदरील चारही नाम फलकांच्या जागा ठरविल्या आहेत.

यावेळी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीचे खजिनदार शुभम पांडुळे, प्रदिप चाबुकस्वार स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल उपस्थित होते. दरम्यान सदरील कार्यक्रमाला जिल्ह्यातील इतिहास प्रेमी आणि शेतकरी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्मायलिंग अस्मिताचे सहकार्यवाह विनीत गाडे यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube