Download App

विषारी दारुचा घोट जीवावर बेतला; तामिळनाडूत 29 जणांचा मृत्यू

कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल.

Tamil Nadu News : तामिळनाडू राज्यातून अतिशय धक्कादायक बातमी (Tami Nadu News) आली आहे. येथील कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 29 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मयतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासन आणि राज्य सरकारवर आगपाखड केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी सरकारी वैद्यकिय महाविद्यालायाल रुग्णालयात धाव घेतली. येथे रुग्णांची भेट घेतली.

राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही (MK Stalin) या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच या गु्न्ह्यात सहभागी असणाऱ्या लोकांना अटक केली आहे. तसेच ही घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे राज्यपाल आरएन रवी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

एका बेटावरून तामिळनाडूत निवडणुकीचे वातावरण तापणार? भाजपने काँग्रेसला खिंडीत गाठले !

या घटनेनंतर बेकायदेशीर पद्धतीने दारू विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जवळपास दोनशे लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. या दारुची तपासणी केल्यानंतर यात घातक मेथनॉल असल्याचे समोर आले. यानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेचा सीआयडी तपास करण्याचा आदेश दिला.

या घटनेनंतर राज्य सरकारने कल्लाकुरिची जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे. पोलीस अधीक्षक समय सिंह मीणा यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अन्य नऊ पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे मयतांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांची मदत करण्यासाठी सरकारने मंत्री ई वी वेलू आणि सुब्रमण्यम यांना कल्लाकुरिची येथे धाडले आहे. एमएस प्रशांत जिल्हाधिकारी तर रजत चतुर्वेदी यांना पोलीस अधीक्षकपदी नियुक्त केले आहे.

चिराग-स्टॅलिन सुसाट, गाठला 100 टक्के स्टाईक रेट; भाजप-शिंदेंचा डाव निम्म्यावर

follow us

वेब स्टोरीज