Download App

DMK नेत्याच्या मुलानेच बनवलं होतं रुपयाचं चिन्ह; तामिळनाडू सरकारने का हटवलं?

ज्या उदयकुमार धर्मलिंगम यांनी रुपयाच्या चिन्हाचं डिझाइन केलं होतं त्यांचे वडील डीएमकेचे नेते आहेत.

Tamil Nadu Rupee Symbol : तामिळनाडूत हिंदीचा राजकीय विरोध विकोपाला गेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Tamil Nadu Govt) आधी डीएमके सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह हटवले आहे. या ऐवजी राज्य सरकारने बजेटमध्ये ‘ரூ’ हे तामिळ भाषेतील चिन्ह घेतले आहे. या चिन्हाचा अर्थ ‘रू’ असा होतो. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारने हा उपद्व्याप केला खरा पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले. भारतीय चलनाचा उल्लेख करणारे ‘₹’ चिन्ह देणारा देखील तामिळच आहे. विशेष म्हणजे ज्या उदयकुमार धर्मलिंगम यांनी या चिन्हाचं डिझाइन केलं होतं त्यांचे वडील डीएमकेचे नेते आहेत.

उदयकुमार धर्मलिंगम कोण

उदयकुमार धर्मलिंगम एक भारतीय शिक्षाविद आणि डिझायनर आहेत. याच उदयकुमार यांनी भारतीय रुपयाचे प्रतिक म्हणून ‘₹’ चिन्हाचे डिझाईन केले होते. उदयकुमार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1978 रोजी तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे झाला आहे. सध्या ते गुवाहाटीत असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील एन धर्मलिंगम सत्ताधारी द्रमुक पक्षाचे आमदार होते. ज्यावेळी उदयकुमार धर्मलिंगम यांनी ही स्पर्धा जिंकली होती तेव्हा एन. धर्मलिंगम यांनी हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आहे असे म्हटले होते. माझ्या मुलाने तामिळनाडूसाठी गौरव आणला आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. उदयकुमार यांनी भारतीय रुपयाचे प्रतीक ‘₹’ चे डिझाइन देवनागरीच्या ‘र’ आणि रोमन R यांचे मिश्रण करुन तयार केले होते. हे चिन्ह भारतीय ध्वजाकडून प्रेरित आहे.

या डिझाइनला 15 जुलै 2010 रोजी हे डिझाइन केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले. खुल्या प्रतियोगितेच्या माध्यमातून हे डिझाइन निवडण्यात आले. यासाठी अर्थ मंत्रालयाने एक स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी एकूण 3 हजार 331 अर्ज सादर करण्यात आले होते. यामध्ये पाच अंतिम डिझाइनमधून उदयकुमार यांचे डिझाइन सिलेक्ट करण्यात आले होते.

भाषा वाद विकोपाला! तामिळनाडूने बजेटमध्ये हटवलं रुपयाचं चिन्ह, कारणही धक्कादायक

follow us