टॅक्सपेयर्ससाठी मोठी बातमी! मुलांच्या शिक्षणावर मिळणार 2.88 लाखांपर्यंत करसूट

हॉस्टेल खर्चावर मिळणाऱ्या करसूट मर्यादेत मोठी वाढ केली आहे. आधी या अलाउन्सवर मिळणारी सवलत खूपच कमी होती.

News Photo   2026 04 18T155000.116

टॅक्सपेयर्ससाठी मोठी बातमी! मुलांच्या शिक्षणावर मिळणार 2.88 लाखांपर्यंत करसूट

सरकारने इनकम टॅक्सच्या नियमांमध्ये (Economy) महत्त्वाचा बदल करत मुलांच्या शिक्षण आणि हॉस्टेल खर्चावर मिळणाऱ्या करसूट मर्यादेत मोठी वाढ केली आहे. आधी या अलाउन्सवर मिळणारी सवलत खूपच कमी होती, पण आता ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः नोकरी करणाऱ्या पालकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.

नेमका काय बदल झाला?

आता मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा अलाउन्स ₹100 वरून थेट ₹3,000 प्रति महिना प्रति मुलगा/मुलगी करण्यात आला आहे. तसंच, हॉस्टेल अलाउन्स ₹300 वरून ₹9,000 प्रति महिना प्रति मुलगा/मुलगी इतका वाढवण्यात आला आहे. ही

सवलत जास्तीत जास्त दोन मुलांसाठी लागू होते.

एकूण किती करसूट मिळू शकते?

जर एखाद्या कुटुंबात दोन मुले असतील, तर वर्षभरात—
शिक्षण अलाउन्स: ₹72,000
हॉस्टेल अलाउन्स: ₹2,16,000
म्हणजे एकूण सवलत ₹2,88,000 पर्यंत जाऊ शकते. यामुळे तुमची टॅक्सेबल सॅलरी कमी होते आणि थेट कर बचत होते.

ही सवलत कोणाला मिळणार?

ही करसूट फक्त पगारदार (salaried) व्यक्तींनाच मिळते, आणि तेही तेव्हाच जेव्हा हे अलाउन्स त्यांच्या CTC (सॅलरी स्ट्रक्चर) मध्ये समाविष्ट असतात.

नवीन टॅक्स सिस्टममध्ये फायदा नाही

महत्त्वाची बाब म्हणजे, ही सवलत फक्त जुन्या टॅक्स सिस्टममध्ये उपलब्ध आहे. ज्यांनी नवीन टॅक्स सिस्टम निवडली आहे, त्यांना या अलाउन्सचा फायदा मिळणार नाही.

किती टॅक्स वाचू शकतो?

जर तुम्ही 30% टॅक्स स्लॅबमध्ये असाल, तर ₹2.88 लाखांच्या सवलतीमुळे सुमारे ₹83,520 इतका कर वाचू शकतो (सेस आणि सरचार्ज वेगळे).

कोणती कागदपत्रं लागणार?

ही सवलत मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पुरावे असणं आवश्यक आहे—

मुलांच्या शाळेच्या फीची पावती

अ‍ॅडमिशनचा पुरावा

हॉस्टेलमध्ये राहण्याचे रेकॉर्ड

हे कागदपत्रे नियोक्ता (employer) पेरोल किंवा टॅक्स सबमिशनवेळी मागू शकतो.

Exit mobile version